Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी फरक स्पष्ट करा:
प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)
खालील मध्ये फरक स्पष्ट करा:
प्राथमिक भाग विक्री (IPO) आणि पुढील भाग विक्री (FPO)
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | प्राथमिक सार्वजनिक विक्री | नंतरची सार्वजनिक विक्री |
| अर्थ | प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचिबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. | नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचिबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला प्रतिभूती देऊ करणे. |
| जारीकर्ता कंपनीचा प्रकार | असूचिबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. | सूचिबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. |
| कधी जारी केले जातात. | जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची इच्छा असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. | जेव्हा एखाद्या सूचिबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची आवश्यकता असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. |
| जारी करण्याचा क्रम | प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते. समभागांच्या प्रथमत: केल्या जाणाऱ्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री असे म्हणतात. | नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतरच केली जाते. नंतरची सार्वजनिक विक्री ही समभागांची दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरची होणारी समभागांची सार्वजनिक विक्री होय. |
| सूचिबद्ध | प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्कये कंपनीला स्वत:ला सूचिबद्ध करून घ्यावे लागते. | नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचिबद्ध केलेली असते. |
| जोखीम | ही गुंतवणूकदारासाठी जास्त जोखमीची असते कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाही. | यामध्ये गुंतवणूकदाराची जोखीम कमी असते कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरून तिच्या पुढील कामगिरीचे अंदाज बांधता येऊ शकतात. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
