मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा. 

मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

मुद्दे मालकीचे भांडवल कर्जाऊ भांडवल
1. अर्थ मालकीचे भांडवल भागधारकांच्या मदतीने उभे केले जाते. कर्जाऊ भांडवल ‘धनको’ मदतीने उभे केले जाते यालाच ‘ऋण भांडवल’ असे म्हणतात.
2. स्रोत हे भांडवल समहक्क भाग व अग्रहक्क भाग यांचे वाटप करून गोळा केले जाते. हे भांडवल कर्जरोखे, मुदत ठेवी. बँकेचे तसेच वित्तिय संस्थेचे कर्ज इत्यादींच्या द्वारे गोळा केले जाते.
3.  गुंतवणुकीवरील परतावा  भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून लाभांश मिळतो. लाभांशाचा दर समहक्क भागांसाठी निश्चित नसतो त्यात चढउतार होत असतात तर अग्रहक्क भागांसाठी तो निश्चित केलेला असतो. कर्जपुरवठादाराला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून व्याज मिळते व्याजाचा दर निश्चित असतो.
4. स्थान भागधारक हे कंपनीचे ‘मालक’ असतात. कर्जपुरवठादार हे कंपनीचे धनको असतात.
5. मतदानाचा हक समहक्कभागधारक कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. कर्जपुरवठादारांना कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क नसतो.
6. भांडवलाची परतफेड भागधारकांना कर्जधारकाच्या पुढे प्राधान्य दिले जात नाही. कंपनी विसर्जनाच्यावेळी कर्ज-धारकांची देणी दिल्यानंतर भागधारकांची रक्‍कम परत केली जाते. कंपनी विसर्जनाच्या वेळी कर्जपुरवठादारांना त्यांची मुद्दल परत घेण्यासाठी भागधारकांच्या पुढे प्राधान्य/अग्रक्रम दिले जाते.
7. संपत्तीवरचा प्रभार भागधारकांचा कंपनीच्या मालमत्तेवर/संपत्तीवर कोणताही प्रभार (charge) नसतो. सुरक्षित कर्जरोख्यांचा कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार असतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×