Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| मुद्दे | मालकीचे भांडवल | कर्जाऊ भांडवल |
| 1. अर्थ | मालकीचे भांडवल भागधारकांच्या मदतीने उभे केले जाते. | कर्जाऊ भांडवल ‘धनको’ मदतीने उभे केले जाते यालाच ‘ऋण भांडवल’ असे म्हणतात. |
| 2. स्रोत | हे भांडवल समहक्क भाग व अग्रहक्क भाग यांचे वाटप करून गोळा केले जाते. | हे भांडवल कर्जरोखे, मुदत ठेवी. बँकेचे तसेच वित्तिय संस्थेचे कर्ज इत्यादींच्या द्वारे गोळा केले जाते. |
| 3. गुंतवणुकीवरील परतावा | भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून लाभांश मिळतो. लाभांशाचा दर समहक्क भागांसाठी निश्चित नसतो त्यात चढउतार होत असतात तर अग्रहक्क भागांसाठी तो निश्चित केलेला असतो. | कर्जपुरवठादाराला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून व्याज मिळते व्याजाचा दर निश्चित असतो. |
| 4. स्थान | भागधारक हे कंपनीचे ‘मालक’ असतात. | कर्जपुरवठादार हे कंपनीचे धनको असतात. |
| 5. मतदानाचा हक | समहक्कभागधारक कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. | कर्जपुरवठादारांना कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क नसतो. |
| 6. भांडवलाची परतफेड | भागधारकांना कर्जधारकाच्या पुढे प्राधान्य दिले जात नाही. कंपनी विसर्जनाच्यावेळी कर्ज-धारकांची देणी दिल्यानंतर भागधारकांची रक्कम परत केली जाते. | कंपनी विसर्जनाच्या वेळी कर्जपुरवठादारांना त्यांची मुद्दल परत घेण्यासाठी भागधारकांच्या पुढे प्राधान्य/अग्रक्रम दिले जाते. |
| 7. संपत्तीवरचा प्रभार | भागधारकांचा कंपनीच्या मालमत्तेवर/संपत्तीवर कोणताही प्रभार (charge) नसतो. | सुरक्षित कर्जरोख्यांचा कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार असतो. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
