English

खालील फरक स्पष्ट करा: अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Questions

खालील फरक स्पष्ट करा:

अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश

फरक स्पष्ट करा:

अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश

Distinguish Between
Advertisements

Solution

  मुद्दे अंतरिम लाभांश अंतिम लाभांश
१. अर्थ  अंतरिम लाभांश, दोन वार्षिक सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो व दिला जातो. अंतिम लाभांश आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर घोषित केला जातो व वाटप केले जाते.
२. कोण जाहीर करतो? संचालक मंडळाच्या सभेत संचालक मंडळ निर्णय घेते व घोषित करते. अंतिम लाभांश संचालक मंडळ शिफारस करते व भागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित करतात.
३. अधिकृतता/अधिकृत परवानगी नियमावलीने दिलेल्या अधिकारानुसार अंतरिम लाभांश घोषित केला जातो. अंतिम लाभांश घोषित करण्यासाठी नियमावलीच्या तरतुदींची/अधिकारपत्राची आवश्यकता नाही.
४. केव्हा घोषित केला जातो? दोन वार्षिक सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो.
५. लाभांश दर अंतरिम लाभांशाचा दर अंतिम लाभांश दरापेक्षा कमी असतो. अंतिम लाभांश दर अंतरिम लाभांश दरापेक्षा जास्त असतो.
६. स्त्रोत  चालू आर्थिक वर्षातील आवश्यक नफा प्राप्ती उपलब्ध असल्यास अंतरिम लाभांश जाहीर केला जातो. अंतिम लाभांश जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या स्रोताचा अवलंब केला जातो. आर्थिक वर्षाच्या नफ्यातून, संचित राखीव निधीतून, भांडवली नफ्यातून, केंद्र सरकारने लाभांश वाटपासाठी पुरविलेल्या निधीतून.
७. लेखासंबंधी बाबी कंपनीचे अंतिम लेखे तयार करण्यापूर्वी जाहीर केला जातो. हा अंतिम लेखे तयार केल्यानंतर जाहीर केला जातो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×