Advertisements
Advertisements
Question
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
‘वीरांगना’ या प्रस्तुत पाठात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
पालकांसोबत होणारे वाद, मुंबईचे किंवा बॉलिवूडचे आकर्षण, शहरातील पत्ता माहीत नसणाऱ्या नातिवाईकांचा ठावठिकाणा शोधताना झालेली दिशाभूल, गरिबी, फेसबुकवरील मैत्रीचा शोध, बेकायदेशीर कामांकरिता केले जाणारे अपहरण अशा विविध कारणांसाठी आईवडिलांपासून, घरापासून दुरावलेल्या मुलांना अनोळखी ठिकाणी मायेचा आधार देणे अत्यंत आवश्यक असते. ही मुले-मुली कोणत्याही वाईट प्रवृत्तींना बळी पडू शकतात. त्यांचा चुकीच्या, वाईट कामांकरिता वापर करून घेतला जाऊ शकतो. त्यांचे बालवय कुस्करले जाते. त्यांचे भविष्य असुरक्षित होते, धोक्यात येते. अशा मुलांना सन्मार्ग दाखवण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळे, या मुलांना स्वत:चा विकास घडवण्याची संधी उपलब्ध झाली. कुटुंबापासून दुरावल्या गेलेल्या या मुलांना जीवनानंद मिळाला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.

‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
