Advertisements
Advertisements
Question
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

Advertisements
Solution
'वीरांगना' या पाठात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या रेखा मिश्रा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. ची पदवी संपादन केली. त्यानंतर बी. एडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी २००८ साली मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक (सबइन्स्पेक्टर) म्हणून जबाबदारी स्वीकारली.
या रेल्वे पोलीस दलातल्या पहिल्या अडीच वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी सुरुवातीचे पहिले वर्ष महिला सुरक्षा यंत्रणेचे काम पाहिले. नंतरच्या केवळ दीड वर्षांच्या काळात रेल्वे स्थानकावर भटकणाऱ्या ४३४ अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. विविध कारणांमुळे घरापासून दुरावलेल्यांना, भरकटलेल्या बालकांना दिशादर्शन करण्याचे, सन्मार्ग दाखवण्याचे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवण्याचे कौतुकास्पद कार्य रेखा मिश्रा करतात. आपल्या नियमित नोकरीसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेखा मिश्रा यांचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.

‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
खालील आकृती पूर्ण करा.

'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
