Advertisements
Advertisements
Question
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?
Advertisements
Solution 1
समजा, अजय आणि विजयचे वय अनुक्रमे x वर्षे आणि y वर्षे आहे.
पहिल्या अटीनुसार,
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे.
∴ y - x = 7
म्हणजेच, -x + y = 7 …(i)
दुसऱ्या अटीनुसार,
दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे.
∴ x + y = 25 …(ii)
समीकरण (ii) मधून (i) वजा करून,
x + y = 25
-x + y = 7
+ - -
2x = 18
∴ x = `18/2 = 9`
∴ अजयचे वय 9 वर्षे आहे.
∴ तर विजयचे वय = अजयचे वय + 7
= 9 + 7
= 16
∴ विजयचे वय 16 वर्षे आहे.
∴ अजयचे वय 9 वर्षे, तर विजयचे वय 16 वर्षे आहे.
Solution 2
समजा, अजयचे वय x वर्षे आहे.
अजय विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे.
∴ विजय वय = x + 7
दिलेल्या अटीनुसार,
त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे.
∴ x + x + 7 = 25
∴ 2x + 7 = 25
∴ 2x = 18
∴ x = `18/2` = 9
∴ अजयचे वय 9 वर्षे आहे.
∴ तर विजयचे वय = अजयचे वय + 7
= 9 + 7
= 16
विजयचे वय 16 वर्षे आहे.
∴ अजयचे वय 9 वर्षे तर विजयचे वय 16 वर्षे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
3a + 5b = 26; a + 5b = 22
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?
2x - y = 2 या समीकरणाची उकल ______ आहे.
x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
