Advertisements
Advertisements
प्रश्न
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
संशोधन करणे हे अत्यंत मेहनतीचे, चिकाटीचे काम आहे. हे काम करण्यासाठी आवश्यक असणारे गुण माझ्यात आहेत का हे मी आधी तपासेन. जर ते गुण माझ्यात नसतील, तर मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन. मोठमोठ्या शास्त्रज्ञांची चरित्रे, माहिती वाचून त्यातून प्रेरणा घेईन. संशोधनासाठी जिज्ञासूवृत्ती ही अत्यंत गरजेची असल्याने मी प्रत्येक गोष्ट 'अशी का' याविषयी विचार करून त्याचा शोध घेईन. कोणत्याही गोष्टीकडे, घटनेकडे पाहताना त्याचा सर्वांगाने विचार करण्याची सवय लावून घेईन. दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या सर्व गोष्टींची नोंद ठेवेन, विज्ञानात व इतर क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाची नोंद ठेवेन. आधी झालेल्या संशोधनाचा आढावा घेईन व त्याचा पुढील प्रयोगांसाठी उपयोग करेन. कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करेन. नव्याने अनुभवास येणाऱ्या गोष्टींची चिकित्सकपणे पडताळणी करेन.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
चौकट पूर्ण करा.

लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
फरक स्पष्ट करा.

