मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पाठातील मला सर्वांत आवडलेली गोष्ट म्हणजे प्रस्तुत पाठाच्या शेवटी शिरीषने मांडलेली संवेदनशील, हळवी व प्रेरक भूमिका.

आपल्या वडिलांच्या आनंदासाठी वादन शिकणारा शिरीष कमी वेळातच वादनात प्रगती व कौशल्य दाखवू लागला; पण कायमच्या बहिरेपणामुळे, संगीतकलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील मात्र त्याचे वादन ऐकू शकत नव्हते. तरीही तो आपल्यासोबत वडिलांना वादनाच्या शिकवणीवर्गाला घेऊन जायचा. नानांनी (शिरीषचे वडील) जेव्हा या जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा शिरीषने 'संगीत' बंद करण्याचे ठरवले.

परंतु, 'जरी नाना त्यावेळी माझे वादन ऐकू शकले नाहीत तरी आता ते माझ्या शेजारी बसून ऐकत आहेत' या विचारामुळेच शिरीष त्या शोकाकुल परिस्थितीतही सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त झाला. तो चोवीस तास व्हायोलिनवादनाचा ध्यासपूर्वक सराव करत होता. सराव करतानाही तबल्यावर, तंबोऱ्यावर साथीला नानाच बसलेले आहेत असा त्याला भास होई. त्याच्या या जबर ध्यासाने झपाटून केलेल्या मेहनतीचा परिपाक म्हणून विद्यालयाच्या कार्यक्रमात त्याने अप्रतिम व्हायोलिनवादन केले व सर्वांची वाहवा मिळवली. त्याची जिद्द, चिकाटी व मेहनत फळाला आली. 'बेटा वाजव, मी ऐकतो आहे' या नानांच्या आश्वासक शब्दांमुळेच त्या कार्यक्रमात तो देहभान हरपून व्हायोलिनवादन करू शकला.

या प्रसंगातून शिरीषची संवेदनशीलता, कष्टाळूवृत्ती, ध्यासपूर्तीसाठीची जिद्द व सकारात्मक भूमिका मला फार आवडली.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
स्वाध्याय | Q ८. (अ) | पृष्ठ १०

संबंधित प्रश्‍न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ

रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा. 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

नावाजलेले - 


आकृतिबंध पूर्ण करा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.


सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.


कारणे शोधा.

काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...


कारणे शोधा.

नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

कुचकामी- 


लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


चूक की बरोबर ते लिहा.

लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×