Advertisements
Advertisements
प्रश्न
अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल ? (sin 70° ≈ 0.94)
Advertisements
उत्तर
समजा, AB ही शिडीची उंची आहे व AE ही शिडीच्या वाहनावरील टोकाची जमिनीपासूनची उंची आहे.
रेख AC ⊥ रेख BD काढा.
उन्नत कोन = ∠BAC = 70°
AB = 20 मीटर
AE = 2 मीटर
ΔABC या काटकोन त्रिकोणामध्ये,
sin 70° = `"BC"/"AB"` .............[व्याख्येप्रमाणे]
∴ 0.94 = `"BC"/20`
∴ BC = 0.94 × 20
= 18.80 मीटर
`square "ACDE"` मध्ये,
∠E = ∠D = 90°
∠C = 90° ...........[रेख AC ⊥ रेख BD]
∴ ∠A = 90° ........[`square "ACDE"` चा उर्वरित कोन]
∴ `square "ACDE"` हा आयत आहे. …....[प्रत्येक कोनाचे माप 90°]
∴ CD = AE = 2 मीटर ......[आयताच्या समोरासमोरील बाजू]
आता, BD = BC + CD ….........[B - C - D]
= 18.80 + 2
= 20.80 मीटर
∴ त्या शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त 20.80 मीटर उंचीवर पोहोचवता येईल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती?
18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितीज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?
`(cos(90 - "A"))/(sin "A") = (sin(90 - "A"))/(cos "A")` = हे सिद्ध करा.
tan θ × A = sin θ, तर A = ?
जर tan θ = `9/40`, तर sec θ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: sec2θ = 1 + `square` ......[त्रि. नित्य समीकरण]
sec2θ = 1 + `square^2`
sec2θ = 1 + `square`
sec θ = `square`
`(sintheta + tantheta)/costheta` = tan θ(1 + sec θ) हे सिद्ध करा.
cosec θ – cot θ = `sin theta/(1 + cos theta)` हे सिद्ध करा.
∆ABC मध्ये, cos C = `12/13` असून BC = 24, तर AC = ?
जर sin A = `3/5` तर 4 tan A + 3 sin A = 6 cos A दाखवा.
