मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, AB व CD दोन इमारतीची उंची दर्शवतात.

BD ही रस्त्याची रुंदी आहे.

रेख AM ⊥ रेख CD काढा. 

उन्नत कोन = ∠CAM = 30°

AB = 12 मीटर

BD = 15 मीटर

`square"ABDM"` मध्ये,

∠B = ∠D = 90°

∠M = 90°  ......[रेख AM ⊥ रेख CD]

∴ ∠A = 90°  .....[`square"ABDM"` चा उर्वरित कोन]

∴ `square"ABDM"` हा आयत आहे. ......[प्रत्येक कोनाचे माप 90°]

∴ `{:("AM" = "BD" = 15 मीटर), ("DM" = "AB" = 12 मीटर):}}` ......[आयताच्या समोरासमोरील बाजू]

ΔAMC या काटकोन त्रिकोणामध्ये,

tan30° = `"CM"/"AM"` ............[व्याख्येप्रमाणे]

∴ `1/sqrt3 = "CM"/15`

∴ CM = `15/sqrt3`

∴ CM = `15/sqrt3 xx sqrt3/sqrt3` ............[छेदाचे परिमेयकरण करून]

∴ CM = `(15sqrt3)/3 = 5sqrt3` मीटर

आता, CD = DM + CM …[C - M - D]

= `12 + 5sqrt3`

= `12 + 5 xx 1.73`

= 12 + 8.65 = 20.65 मीटर

∴ दुसऱ्या इमारतीची उंची 20.65 मीटर आहे.

shaalaa.com
त्रिकोणमितीचे उपयोजन (Application of trigonometry)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: त्रिकोणमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ १३९]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 त्रिकोणमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q 8. | पृष्ठ १३९

संबंधित प्रश्‍न

एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती?


12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती?


18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितीज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.


जेव्हा आपण क्षितीजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा ______ कोन होतो. 


दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?


अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल ? (sin 70° ≈ 0.94)


खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

जर ∠A = 30° तर tan 2A = ?


`(sintheta + tantheta)/costheta` = tan θ(1 + sec θ) हे सिद्ध करा.


∆ABC मध्ये, cos C = `12/13` असून BC = 24, तर AC = ? 


बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×