Advertisements
Advertisements
प्रश्न
10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत?
Advertisements
उत्तर
10 पासून 250 पर्यंत 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या:
12, 16, 20, ..., 248
वरील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.
∴ a = 12, d = 16 - 12 = 4
वरील अंकगणिती श्रेढीतील पदांची संख्या n मानली
तर, tn = 248
आता, tn = a + (n - 1)d
∴ 248 = 12 + (n - 1)4
∴ 248 = 12 + 4n - 4
∴ 248 = 8 + 4n
∴ 4n = 248 - 8
∴ 4n = 240
∴ n = `240/4`
∴ n = 60
∴ 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य असणाऱ्या नैसर्गिक संख्या 60 आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
1, 8, 15, 22,...
येथे, a = `square`, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`,...
t2 - t1 = `square - square = square`
t3 - t2 = `square - square = square`
∴ d = `square`
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
-3, -8, -13, -18,...
येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...
t2 - t1 = `square`
t3 - t2 = `square`
∴ a = `square`, d = `square`
खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा.
7, 13, 19, 25, ...
जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
1, 4, 7, 10, 13 ......... या अंकगणिती श्रेढीची पुढील दोन पदे ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
9, 15, 21, 27 अंकगणिती श्रेढीमध्ये t3 = ?
जर a = 20 आणि d = 3, तर tn शोधा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t4 = 12 आणि d = -10, तर tn काढा.
खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.
7, 13, 19, 25, ............
कृती:
दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........
पहिले पद a = 7; t19 = ?
tn = a + `(square)`d ..............(सूत्र)
∴ t19 = 7 + (19 - 1) `square`
∴ t19 = 7 + `square`
∴ t19 = `square`
