HSC Commerce (English Medium)
HSC Science (General)
HSC Arts (English Medium)
HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2022-2023
Date & Time: 20th July 2023, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
- आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननिवमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
|
ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे 'राखी पौर्णिमा!' सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण-भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले; तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. चोवीसजण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सरू झालं 'मिशन लडाख'. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बर्याच खटपटी करून आम्हांला निघण्यापूर्वी १४ कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हांला १४ कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं; पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वापुढे बाद झाली. “तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.'' अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले, “विसरू नका - वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड.'' त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून! |
- (आकलन) (२)
ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना व सण -
(य) -----------------
(र) ----------------- - (आकलन) (२)
लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना कर्नल झा दहा वर्षांत दोनदा भेटले ती ठिकाणे -
(य) -----------------
(र) ----------------- - (स्वमत/अभिव्यक्ती) (४)
“तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.'' या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा.
किंवा
“बहीण-भावाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होतं,” हे तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
|
मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तररात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम, की कुणाला चाहूलदेखील लागू नये; पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठं तरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे, असं वाटत राहतं. मी हलकेच उठतो. चूळ भरतो. डायनिंग टेबलजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो आसमंतात काळाकुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचादेखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरंदेखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे तीन- साडेतीन तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक, ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखरझोपेत असतं. साऱ्या चिंता-काळज्या मिटल्या-विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं, आपलं खरंखुरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचंदेखील. तांबडसर बोगनवेलीचंदेखील. केशरी गुलमोहोराचंदेखील. जांभुळसर जॅक्रांडाचंदेखील. किरमिजी-निळसर-पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचंदेखील. पांढऱ्याशुभ्र नि रक्तचंदनी चाफ्याचंदेखील. |
- (आकलन) (२)
कारणे शोधा व लिहा:
(य) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो.
कारण -
(र) पहाटेची वेळ मला फार आवडते.
कारण - - (आकलन) (२)
उताऱ्यात आलेल्या दोन फुलझाडांची नावे लिहा.
(य) --------------
(र) --------------- - (स्वमत/अभिव्यक्ती) (४)
'पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळकीचे नाते,' तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
| कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पाहा, की बाबल्या, तुझं नंदनवन रे कोणतं? तो सांगेल, 'मुंबईतल्या कारखान्यात नोकरी नि डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी, हेच माझं नंदनवन,' मग भले पाण्याच्या नावाने ठणठणाट असो वा इतर सुविधांच्या नावाने आनंद, पण मुंबईत स्वतःची खोली पाहिजे. तोच त्या कोकण्याचा स्वर्ग. तेच मुंबईतल्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पाहा. तो तत्काळ सांगेल, 'जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे!' वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे वांधे असतात. घरात भाऊबंदकी असते. पैशांच्या नावाने शुद्ध खडखडाट असतो. गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात नि गुरांपैकी निम्मी भाकड असतात. सावकारांचे तगादे कायम असतात ते वेगळंच. तरीसुद्धा मुंबईकर कामगारांचं अवघं लक्ष त्यांच्या कोकणातल्या खेड्यात असतं. इकडे शहरवस्तीत सांजवलं की त्याला गावाकडच्या शांत दिवेलागणीची आठवण येते. गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाद त्याला ऐकू येतो. तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे चिंचपोकळीत छळू लागतो. |
- (आकलन) (२)
कोकणातील बाबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना -
(य) --------------
(र) -------------- - (आकलन) (२)
मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या येणाऱ्या आठवणी लिहा.
(य) --------------
(र) --------------
Chapter:
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
|
विंचू चावला वृश्चिक चावला। पंचप्राण व्याकुळ झाला। मनुष्य इंगळी अति दारुण। ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |
- (आकलन) (२)
भारुडातील विंचू हे या विकारांचे प्रतीक आहे -
य) ----------------
(र) ---------------- - (आकलन) (२)
विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय -
(य) ----------------
(र) ---------------- - (अभिव्यक्ती) (४)
'दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे.' हे या भारुडाच्या आधारे स्पष्ट करा.
Chapter:
खालील ओळींचा अर्थ लिहा:
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
Chapter:
‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.
Chapter: [2.11] आरशातली स्त्री (कविता)
| कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा! सांगती 'तात्पर्य' माझें सारख्या खोट्या दिशा: “चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!" |
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Chapter:
पुढील उत्ताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
| कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कोशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात 'कथाकथन' क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करीत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. |
- उत्तरे लिहा: (२)
कथाकथन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाते -
(य) ---------------
(र) --------------- - कथेच्या अभिवाचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होण्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी लिहा. (२)
Chapter:
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
Chapter: [3.01] शोध
'बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान' याबद्दल तुमचे मत लिहा.
Chapter:
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
Chapter: [3.01] शोध
उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दांत विशद करा.
Chapter:
Advertisements
माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter: [4.02] माहितीपत्रक
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाची वैशिष्ट्ये लिहा.
Chapter:
पुढील मुद्द्यांच्या आधारे नोकरीसाठी व प्रवेशासाठी आलेल्या उमेदवाराला 'आतून' जाणून घेणे गरजेचे असते हे स्पष्ट करा:
बोद्धिक क्षमता - ज्ञानाची पातळी - जीवनविषयक दृष्टिकोन - निर्णयक्षमता - भाषेवरील प्रभुत्व - गटनेतृत्व - यशाचे श्रेय.
Chapter:
पुढील मुद्द्यांच्या आधारे 'माहितीपत्रकाची गरज' स्पष्ट करा:
माहितीपत्रक म्हणजे - विविध क्षेत्रांची नावे व त्यातील गरज - लोकमत आकर्षित - वेगळेपणा व वैशिष्ट्ये - ग्राहकाचा फायदा.
Chapter:
पुढील मुद्द्यांच्या आधारे 'अहवाललेखनाची आवश्यकता' स्पष्ट करा:
महत्त्वाचा दस्तऐवज - अधिकृतता - वस्तुनिष्ठ लेखन - भविष्यातील योजनांसाठी मदत - घडामोडींचा एकत्र आढावा.
Chapter:
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख - व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख - मुलाखतीवर आधारित वृत्ललेख - ऐतिहासिक स्थळ - गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
ती आतून हसतात.
ती फार हसतात आतून.
ती आतून हसत राहतात.
ती खूप आतून हसतात.
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Advertisements
'पावलोपावली' या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा:
अव्ययीभाव समास
बहुव्रीही समास
द्वंद्व समास
तत्पुरुष समास
Chapter:
श्रीधरपंतांनी बैलांना बांधले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
यांपैकी नाही
Chapter:
कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा:
केशवने सदरा खरेदी केला.
स्वाती चित्र रंगवते.
त्यांनी शेळ्यांना बांधले.
यांपैकी नाही.
Chapter:
दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
वरील काव्यपंक्तींतील अलंकार ओळखून लिहा.
अनन्वय
अर्थांतरन्यास
अपन्हुती
अतिशयोक्ती
Chapter:
खालील कृती करा.
कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-
उपमेय ____________
उपमान ____________
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
'आभाळाकडे डोळे लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायांतून ओळखून लिहा:
ढगाकडे पाहणे.
पावसाची वाट पाहणे.
आकाश न्याहाळणे.
आभाळ पाहणे.
Chapter:
'आभाळाकडे डोळे लावणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
Chapter:
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी अनुभवलेला निसर्ग
Chapter:
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझा आवडता खेळ
Chapter:
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
घंटागाडीवरील कर्मचाऱ्याचे मनोगत
Chapter:
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शिक्षक झालो, तर...
Chapter:
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
युग तंत्रज्ञानाचे
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam Marathi with solutions 2022 - 2023
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam -2023 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam.
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
