हिंदी

‘रडू नकोस खुळे, उठ!आणि डोळ्यातले हे आसूसोडून दे शेजारच्या तळ्यातनि घेऊन ये हातातनुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’ या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे यांनी या कवितेत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्री ने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना असून सहज आरशात पाहताना कवितेतील नायिकेच्या गावकाळाच्या स्मृती जागृत होऊन संवाद सुरू होतो तो अंतर्मनाचा प्रत्यक्ष मनाशी आणि अंतर्बाह्य झालेला बदल दिसतो. चैतन्यमयी, अल्लड, बालपण, तेजस्वी तारुण्यामधली स्वप्ने, ध्येय कुठल्याकुठे गायब होतात. परंतु गतआयुष्याबद्दल आरशात पाहणाऱ्या स्त्रीला काहीच वाटत नाही, ती मागे वळून पाहते ते स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून. मात्र तिला इथे प्रश्न पडतो की आपल्यात ही स्थितप्रज्ञा आली कुठून?

बालपणी छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद कुठेतरी हरवल्याची तिला जाणीव होते. आरशातील स्त्री या व्यथांबद्दल भावना व्यक्त करत नसली तरी आरशाबाहेरील स्त्रीला म्हणजेच तिच्या प्रतिमेला आरशातील, स्त्रीची भावना अस्वस्थ करते. तिच्या मनाची चलबिचल स्थिती पाहून तिचे अंतर्मन आरशातील स्त्रीला सावरते, जवळ घेते आणि तितकेच अधिकारवाणीने ती तिला तिच्यातील नवचैतन्याची, जिद्दीची, आत्मविश्वासाची जाणीव करून देते. ती डोव्व्यातील आसवे तिला शेजारच्या तळ्यात सोडून देण्यास सांगते आणि याच तळ्यात उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले घेऊन येण्यास सांगते.

डोळ्यातील आसवे हे निराशेचे प्रतीक असून ही मनातील निराशा दूर फेकून देवून भवतालच्या अवकाशातून नवचैतन्य घेऊन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने, जिद्दीने, सामर्थ्याने या सर्वांवर मात करावी हे नवउमेदीचे भान आरशाबाहेरील स्त्रीमध्ये म्हणजेच कवितेतील नायिकेमध्ये ‘आरशातील स्त्री’ नायिकेचे अंतर्मन जागृत करते. तिला उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते.

संवादात्मक शैलीतून कवयित्रीने केलेला हा भावनाविष्कार समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाविषयीची अनुभूती घडवतो. संसारामुळे गांजून गेलेली स्त्री ही स्वतःच्या मनाचा, इच्छेचा, स्वप्नांचा, ध्येयाचा कसा कोंडमारा करून घेते म्हणजेच तिला जर मानसिक व शारीरिक आधार मिळताच ती आपल्या मरगळलेल्या मनाची कात टाकून पुन्हा नवचैतन्याचे प्रेरित होऊन पुन्हा जिद्दीने कशी उभी राहते याची अनुभूती येते. डोळ्यातले आसू शेजारचे तळे, कमळाची फुले अशा शब्दप्रयोगामुळे आशयालाही गतिमानता प्राप्त होते. संवादातील तरलता अधिक प्रभावी व गहिरी होत जाते आणि स्त्री जाणीवेच्या मनातील विविध पैलू उलगडून स्त्री मनाशी एकरूप होतात. हेच कवितेचे आणि कवयित्रीचे यश म्हणावे लागेल.

shaalaa.com
आरशातली स्त्री
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (July) Official

संबंधित प्रश्न

कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन


कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश


वर्णन करा.

आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-


वर्णन करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.

तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.


जोड्या जुळवा.

'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
(२) आभाळ झुल्यावर झुलणारी (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
(३) देह तोडलेले फूल (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
(४) पारंपरिकतेचे वरदान (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा (उ) मनातले सुंदर भाव

खालील ओळींचा अर्थ लिहा.

माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!


खालील ओळींचा अर्थ लिहा.

स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!


काव्यसौंदर्य.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.


रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’


अभिव्यक्ती.

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.


अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

या ओळीचे रसग्रहण करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
          ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
         देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
        वरदान समजून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×