Advertisements
Advertisements
प्रश्न
| कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा! सांगती 'तात्पर्य' माझें सारख्या खोट्या दिशा: “चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!" |
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Advertisements
उत्तर
आशयसौंदर्य: समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार 'रंग माझा वेगळा' या गझलेमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवीने म्हटले आहे.
काव्यसौंदर्य: उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव व्यक्त करतो की, कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, हे मला कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. पण माझ्या प्रामाणिकपणे जगण्याचा या जीवनाने विश्वासघात केला. ही माणसे नि या दिशा मला आयुष्याचे सार सांगताना माझी दिशाभूल करतात. जो नीट चालतो, त्याला पांगळा म्हणतात नि जो नीट पाहतो, त्याला जग आंधळा म्हणते. अशा प्रकारे ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची पुरी फसवणूक केली आहे.
भाषिक वैशिष्ट्ये: या कवितेत 'गझल' हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. 'मतला ' धरून यामध्ये सहा शेरांची (रेख्तो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. 'सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य' यांतील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पकड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.
