Advertisements
Advertisements
प्रश्न
उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दांत विशद करा.
Advertisements
उत्तर
देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बापू गुरुजींना आपल्या गावाच्या प्रगतीची स्वप्नं पडू लागली. त्यांनी खूप मेहनत घेऊन गावातील शाळेचा दर्जा उंचावला. चौथीपर्यंत असलेली शाळा सातवीपर्यंत वाढवली. गुरुजींनी गावाच्या एकंदर विकासासाठी स्वतःला पूर्णतः झोकून दिलं. मात्र गावातील काही उचापती लोकांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी गुरुजींच्या कामात अडथळे आणायला सुरुवात केली.
गुरुजींच्या प्रयत्नांनी अखेर गावात पोस्ट ऑफिस सुरू झालं, पण काही जणांनी त्यावर टीका करत म्हणायला सुरुवात केली की, “कोणी मेल्याशिवाय आपण कोणाला चिठ्ठी पाठवली नाही. तर पोस्ट आपल्या काय कामाचं?'' असाच विरोध गावात येणाऱ्या सडकेलाही मिळाला. गावात सडक येणार, यावर उचापती लोक म्हणू लागले, “आपल्याला कशाला सडक पाहिजे? फुकटच तेवढी जमीन पडीक पडते. आपलं पीक का बुडू द्यायचं?” त्यामुळे सडक येण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. गुरुजींनी गावात दवाखाना सुरू केला, पण उचापती लोकांच्या विरोधामुळे तो सुद्धा गावकऱ्यांना नकोसा वाटू लागला.
अशा रीतीने गावाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या बापू गुरुजींना गावातील काही उचापतीखोर लोकांनी सतत अडथळे निर्माण करून त्रास दिला.
