Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
| कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पाहा, की बाबल्या, तुझं नंदनवन रे कोणतं? तो सांगेल, 'मुंबईतल्या कारखान्यात नोकरी नि डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी, हेच माझं नंदनवन,' मग भले पाण्याच्या नावाने ठणठणाट असो वा इतर सुविधांच्या नावाने आनंद, पण मुंबईत स्वतःची खोली पाहिजे. तोच त्या कोकण्याचा स्वर्ग. तेच मुंबईतल्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पाहा. तो तत्काळ सांगेल, 'जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे!' वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे वांधे असतात. घरात भाऊबंदकी असते. पैशांच्या नावाने शुद्ध खडखडाट असतो. गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात नि गुरांपैकी निम्मी भाकड असतात. सावकारांचे तगादे कायम असतात ते वेगळंच. तरीसुद्धा मुंबईकर कामगारांचं अवघं लक्ष त्यांच्या कोकणातल्या खेड्यात असतं. इकडे शहरवस्तीत सांजवलं की त्याला गावाकडच्या शांत दिवेलागणीची आठवण येते. गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाद त्याला ऐकू येतो. तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे चिंचपोकळीत छळू लागतो. |
- (आकलन) (२)
कोकणातील बाबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना -
(य) --------------
(र) -------------- - (आकलन) (२)
मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या येणाऱ्या आठवणी लिहा.
(य) --------------
(र) --------------
आकलन
Advertisements
उत्तर
- (य) मुंबईतील कारखान्यात नोकरी.
(र) डोकं टेकायला चाळीत हक्काची कोटरी. - (य) गावाकडच्या शांत दिवेलागणीची आठवण.
(र) गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाद.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
