Advertisements
Advertisements
प्रश्न
'बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान' याबद्दल तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात बापू गुरुजी राहत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावाच्या विकासासाठी समर्पित केले. घरची हलाखीची परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षण घेतले आणि आपल्या कष्टातून गावासाठी कार्य करायला सुरुवात केली. स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून ते पूर्णवेळ शाळेत रमले.
गुरुजींच्या प्रयत्नांमुळे शाळेचा दर्जा वाढला; चौथीपर्यंत असलेली शाळा सातवीपर्यंत झाली. त्यांनी शाळेत तालीमखानाही सुरू केला, जरी काही गावकऱ्यांचा त्याला विरोध होता. त्यांच्या शिक्षणसेवेची दखल घेत त्यांना ‘आदर्श शिक्षक’ हा सन्मान प्राप्त झाला. त्या पारितोषिकातून त्यांनी वाचनालय आणि एक लहान बोर्डिंगही सुरू केलं. सर्व विद्यार्थ्यांकडे ते आपल्या मुलांप्रमाणे पाहत.
गुरुजींना गावात दवाखाना आणायचा होता, त्यांनी पोस्ट ऑफिस सुरू केलं. सडक गावात यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण गावकऱ्यांनी ती येऊ दिली नाही, याचं त्यांना दुःख झालं. तरीही त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी वान नदीचे कोरडं पडलेलं पात्र वळवून त्याला नवा जीवनप्रवाह दिला. अशा प्रकारे बापू गुरुजींनी अख्खं आयुष्य गावाच्या प्रगतीसाठी समर्पित केलं.
