Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

Advertisements
उत्तर
सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत
मित्रमैत्रिणींनो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वावरताना आपण आजूबाजूला पडलेला जो कचरा बघतो त्या कचऱ्याची साफ-सफाई जी व्यक्ती करते त्याला सफाई कर्मचारी असे बोलतात. माझ्या हातातील झाडू पाहून तुम्ही मला ओळखलं असेलच. होय, मी सफाई कर्मचारी आहे. परिसर स्वच्छ ठेवणे हे आमचे काम. ते आम्ही नियमित करतो. वर्षाचे बारा महिने आमची स्वच्छता मोहिम सुरू असते. 'स्वच्छ भारत सुंदर भारत' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र झटतो. स्वच्छता हीच मानवसेवा, देशसेवा आणि ईश्वरसेवा मानून मी हे काम आवडीने स्वीकारले. या कामाचा जो काही मोबदला मला मिळतो त्यापेक्षा अधिक पटीने आपला परिसर, आपले शहर स्वच्छ ठेवल्याचे समाधान मिळते.
दिवसभर कामासाठी धावपळ करणारी लोक जेव्हा कचऱ्याचा डबा बाजूला असेल तर रस्ता बदलून थोडे लांबून निघून जातात. अगदी सकाळपासून आमचे काम सुरू होते. गल्लोगल्लीत कचरा गोळा करणे, घंटागाडीमध्ये तो भरणे, कचऱ्याच्या मैदानात नेऊन ओतणे, त्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणे अशी एक ना अनेक कामे चालूच असतात. ना उन्हाची झळ, ना थंडी, ना पाऊस, आम्ही प्रत्येक ऋतूत आमचे काम चोख बजावतो. सरकारने आमच्या आरोग्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या असल्या तरीही सतत कचऱ्याच्या संपर्कात असल्यामुळे अधूनमधून आरोग्याच्या तक्रारी उद्भवतच असतात; पण त्याही बाजूला सारत आम्ही कामाला प्राधान्य देतो.
रोज न चुकता आमचा संपर्क या साफ-सफाई मध्ये वेगवेगळ्या गोष्टीशी येतो. मागील वर्ष मात्र खूपच भितीदायक होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि सगळयांनी आपापली कामे बंद केली. आमचे काम मात्र सुरुच होते. लोकांनी केलेल्या कचऱ्याशी आमचा सतत येणारा संपर्क, रस्त्यांवर फेकलेले मास्क त्यात हॉस्पिटलमधील जैविक कचरा यांमुळे आम्ही सतत भीतीच्या छायेत होतो. घरचे तर घाबरून गेले होते आणि त्यांच्या चिंतेने आम्हीही हादरलो होतो. आम्हांला सुट्टी घेऊन चालणारच नव्हते. आम्ही कचरा साठू दिला असता, तर कोरोनाबरोबरच इतर साथीचे आजार पसरण्यास वेळ लागला नसता. कोरोना काळात देशातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा वर्कर्स यांच्या खांद्याला खांदा लावून सफाई कर्मचारीही कार्यरत होते याचा मला सार्थ अभिमान वाटतो. स्थळ आणि काळाचं भान विसरून आम्ही काम केलं. तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो.
माझ्यासारखे अजून खूप सफाई कर्मचारी आहेत जे त्यांचे काम खूप मनापासून आणि अभिमानाने करतात. लोकांना मात्र आजही या परिस्थितीची जाणीव होत नाही. सफाई कर्मचारी हा तुमच्यासारखाच एक माणूस आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आम्हांला सन्मान दिला नाहीत तरी चालेल; पण आम्हांला तुच्छ लेखू नका. आम्ही जरी नोकरदार मंडळी असलो तरीही स्वच्छता हा एक समाजसेवेचाच भाग आहे. आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करा. ओला व सुका कचरा वेगवेगळया डब्यात ठेवा. मास्क, हॅण्डग्लोव्हजची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. थोडी मानसिकता बदलून कचराकुंडीमध्येच कचरा टाकला गेला, तर स्वच्छतेचे आमचे काम अधिक सोपे होईल.
तेव्हा तुम्हा सर्व लोकांना माझी एकच विनंती आहे की आम्हांला ही आपलेच समजा आणि आमच्याशी प्रेमाने वागा. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हांला तुमच्या मदतीची गरज आहे. तेवढं कराल ना तुम्ही आमच्यासाठी?
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.

खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
