Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.

Advertisements
उत्तर
बाजू PQ || बाजू SR व रेख SQ ही त्यांची छेदिका आहे. [पक्ष]
∴ ∠QSR ≅ ∠SQP .....[व्युत्क्रम कोन]
∴ ∠ASR ≅ ∠AQP .....(i) [Q-A-S]
ΔASR व ΔAQP मध्ये,
∠ASR ≅ ∠AQP .......[(i) वरून]
∠SAR ≅ ∠QAP .......[विरुद्ध कोन]
∴ ΔASR ∼ ΔAQP .......[समरूपतेची कोको कसोटी]
∴ `"AS"/"AQ" = "SR"/"PQ"` .............(ii) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
परंतु, AS = 5AQ ........[पक्ष]
∴ `"AS"/"AQ" = 5/1` ..........(iii)
∴ `"SR"/"PQ" = 5/1` .......[(ii) व (iii) वरून]
∴ SR = 5PQ
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.
आकृती मध्ये रेख PQ || रेख DE, A (Δ PQF) = 20 एकक, जर PF = 2 DP आहे, तर A(`square"DPQE"`) काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
A(Δ PQF) = 20 एकक, PF = 2 DP, DP = x मानू. ∴ PF = 2x
DF = DP + `square` = `square` + `square` = 3x
Δ FDE व Δ FPQ मध्ये
∠ FDE ≅ ∠`square` (संगत कोन)
∠ FED ≅ ∠`square` (संगत कोन)
∴ Δ FDE ∼ Δ FPQ .............(कोको कसोटी)
∴ `("A"(Δ"FDE"))/("A"(Δ"FPQ")) = square/square = ((3"x")^2)/((2"x")^2) = 9/4`
A(Δ FDE) = `9/4` × A(Δ FPQ ) = `9/4 xx square = square`
A(`square` DPQE) = A(Δ FDE) - A(Δ FPQ)
= `square - square`
= `square`

आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

आकृती मध्ये XY || बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती : 2AX = 3BX
∴ `"AX"/"BX" = square/square`
`("AX" + "BX")/"BX" = (square + square)/square` ......(योग क्रिया करून)
`"AB"/"BX" = square/square` ......(I)
ΔBCA ~ ΔBYX .......(समरूपतेची `square` कसोटी)
∴ `"BA"/"BX" = "AC"/"XY"` ..........(समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)
∴ `square/square = "AC"/9`
∴ AC = `square` ..........(I) वरून
ΔABC मध्ये ∠A = 90°. `square`DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE2 = BD × EC (ΔGBD व ΔCFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.)
खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60°

आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ || बाजू SR, AR = 5 AP, तर सिद्ध करा, SR = 5 PQ.
