Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीमध्ये समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ || बाजू SR, AR = 5 AP, तर सिद्ध करा, SR = 5 PQ.
Advertisements
उत्तर
बाजू PQ || बाजू SR व
रेख SQ ही त्यांची छेदिका आहे. .......[पक्ष]
∴ ∠QSR ≅ ∠SQP ........[व्युत्क्रम कोन]
∴ ∠ASR ≅ ∠AQP …(i) [Q−A−S]
∆ASR व ∆AQP मध्ये,
∠ASR ≅ ∠AQP ...................[(i) वरून]
∠SAR ≅ ∠QAP ..............[विरुद्ध कोन]
∴ ∆ASR ∼ ∆AQP .................[समरूपतेची कोको कसोटी]
∴ `"AR"/"AP" = "SR"/"PQ"` ....(ii) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
परंतु, AR = 5 AP ..................[पक्ष]
∴ `"AR"/"AP" = 5/1` ............…(iii)
∴ `"SR"/"PQ" = 5/1` ......[(ii) व (iii) वरून]
∴ SR = 5 PQ
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल?

समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?

आकृती मध्ये XY || बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती : 2AX = 3BX
∴ `"AX"/"BX" = square/square`
`("AX" + "BX")/"BX" = (square + square)/square` ......(योग क्रिया करून)
`"AB"/"BX" = square/square` ......(I)
ΔBCA ~ ΔBYX .......(समरूपतेची `square` कसोटी)
∴ `"BA"/"BX" = "AC"/"XY"` ..........(समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)
∴ `square/square = "AC"/9`
∴ AC = `square` ..........(I) वरून
खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?
∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?

आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC. तर सिद्ध करा, की CA2 = CB × CD.

वरील आकृतीत, ΔABC मध्ये रेख XY || बाजू AC, जर 2AX = 3BX आणि XY = 9, तर AC ची किंमत काढा.

