हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, नदीच्या प्रवाहाचा वेग x किमी/तास आहे.

बोटीचा वेग 12 किमी/तास.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला बोटीचा वेग कमी होतो, तसेच प्रवाहाच्या दिशेने तो वाढतो.

बोटीचा वेग पाण्याच्या प्रवाहापेक्षा अधिक आहे.

∴ x < 12

∴ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग = (12 - x) किमी/तास

व प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग = (12 + x) किमी/तास

आता, वेळ = `(अंतर)/(वेग)`

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी अंतर कापण्यास बोटीला लागलेला वेळ = `36/(12 - x)` तास

प्रवाहाच्या दिशेने 36 किमी अंतर कापण्यास बोटीला लागलेला वेळ = `36/(12 + x)` तास

दिलेल्या अटीनुसार, एकाच ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी प्रतीकला लागणारा वेळ

∴ `36/(12 - x) + 36/(12 + x) = 8`

∴ `36(1/(12 - x) + 1/(12 + x)) = 8`

∴ `1/(12 - x) + 1/(12 + x) = 8/36`

∴ `((12 + x) + (12 - x))/((12 - x)(12 + x)) = 2/9`

∴ `24/(144 - x^2) = 2/9   ...[(a + b)(a - b) = a^2 - b^2]`

∴ `24 xx 9 = 2(144 - x^2)`

∴ 216 = 288 - 2x2

∴ 2x2 = 288 - 216

∴ 2x2 = 72

∴ x2 = 36

∴ x = ± 6  ...[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

परंतु, वेग कधीही ऋण नसतो.

∴ x = 6

∴ नदीच्या प्रवाहाचा वेग 6 किमी/तास आहे.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.6 [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.6 | Q 7. | पृष्ठ ५२

संबंधित प्रश्न

विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.


श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.


पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा ६ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ४ दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.


तळवेल येथील शेतकरी श्री. दिनेश यांच्या आयताकृती शेतीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.


एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?


मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.


एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×