हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो,

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?

योग
Advertisements

उत्तर

समजा, मोठ्या नळाने टाकी भरण्यास x तास लागतात.

∴ मोठ्या नळाने 1 तासात `1/x` इतकी टाकी भरेल.

तसेच, लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ = (x + 3) तास

∴ लहान नळाने 1 तासात `1/(x + 3)` इतकी टाकी भरेल.

∴ एका तासात दोन्ही नळांनी भरला जाणारा टाकीचा भाग

`= (1/x + 1/(x + 3))`

परंतु, टाकी दोन्ही नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते.

∴ एका तासात टाकी दोन्ही नळांनी `1/2` इतकी भरेल.

दिलेल्या अटीनुसार,

`1/x + 1/(x + 3) = 1/2`

∴ `(x + 3 + x)/(x(x + 3)) = 1/2`

∴ `(2x + 3)/(x(x + 3)) = 1/2`

∴ 2(2x + 3) = x(x + 3)

∴ 4x + 6 = x2 + 3x

∴ x2 + 3x − 4x − 6 = 0   ...`[(-6= -3; 2),(-3 xx 2 = -6),(- 3 + 2 = -1)]`

∴ x2 − x − 6 = 0

∴ x2 − 3x + 2x − 6 = 0

∴ x(x – 3) + 2(x – 3) = 0

∴ (x – 3)(x + 2) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने

∴ x − 3 = 0  किंवा  x + 2 = 0

∴ x = 3  किंवा  x = −2

परंतु, वेळ कधीही ऋण नसते.

∴ x = 3  आणि  x + 3 = 3 + 3 = 6

∴ मोठ्या नळाने टाकी भरण्यास 3 तास आणि लहान नळाने टाकी भरण्यास 6 तास लागतील.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 15. | पृष्ठ ५४

संबंधित प्रश्न

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.


श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक ₹ 40 असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितीमूल्य ₹ ६०० असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.


460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?


मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?


दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.


रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते, तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा.


तळवेल येथील शेतकरी श्री. दिनेश यांच्या आयताकृती शेतीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.


मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 असल्यास त्यांची आजची वये काढा.


एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×