हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे,

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?

योग
Advertisements

उत्तर

समजा, सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण x आहेत.

∴ दुसऱ्या चाचणीतील गुण = x + 10

दिलेल्या अटीनुसार, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे

∴ 5(x + 10) = x2

∴ 5x + 50 = x2

∴ x2 - 5x - 50 = 0 ...`[(-50= -10; 5),(-10 xx 5 = - 50),(- 10 + 5 = - 5)]`

∴ x2 - 10x + 5x - 50 = 0

∴ x(x - 10) + 5(x - 10) = 0

∴ (x - 10)(x + 5) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ x - 10 = 0   किंवा  x + 5 = 0

∴ x = 10  किंवा  x = - 5

परंतु, गुण ऋण असू शकत नाहीत.

∴ x = 10

∴ सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण 10 आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरणाचे उपयोजन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.6 [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.6 | Q 5. | पृष्ठ ५२

संबंधित प्रश्न

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.


श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक ₹ 40 असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितीमूल्य ₹ ६०० असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितीमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.


एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.


समलंब मध्ये `square`ABCD मध्ये AB || CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा.

उकल:

`square`ABCD समलंब चौकोन आहे. AB || CD

`"A"(square "ABCD") = 1/2 xx ("AB" + "CD") xx square`

∴ `33 = 1/2(x + 2x + 1) xx square`

∴ `square` = (3x + 1) × `square`

∴ 3x+ `square` - `square` = 0

∴ 3x (____) + 10 (____) = 0 

∴ (3x + 10)(_____) = 0

∴ (3x + 10) = 0  किंवा  `square` = 0

∴ x = `- 10/3` किंवा x = `square`

परंतु, लांबी ऋण नसते.

∴ `x ne (- 10)/3`   ∴  x = `square`

AB = ______, CD = ______, AD = BC = _______


मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?


रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते, तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा.


एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो, तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?


खालील शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.

कृती: पहिली सम नैसर्गिक संख्या x मानू.

दुसरी क्रमागत सम नैसर्गिक संख्या = (______)

दिलेल्या अटीनुसार,

x2 + (x + 2)2 = 244 

x2 + x2 + 4x + 4 – (______) = 0

2x2 + 4x – 240 = 0

x2 + 2x – 120 = 0

x2 + (______) – (______) – 120 = 0

x (x + 12) – (______) (x + 12) = 0 

(x + 12) (x – 10) = 0

x = (______) / x = 10

परंतु, नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून x = -12 शक्य नाही.

म्हणून, पहिली नैसर्गिक संख्या x = 10 असेल.

म्हणून, दुसरी नैसर्गिक संख्या = x + 2 = 10 + 2 = 12 असेल.


एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.


एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×