Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.
Concept: कथालेखन
समानार्थी शब्द लिहा.
रात्र - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
समानार्थी शब्द लिहा.
संताप - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
हे पेन काहीसं वजनदार आहे.
Concept: व्याकरण
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.
Concept: व्याकरण
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ | ||
| (i) | भांबावून जाणे | (१) | खूप प्रेम करणे |
| (ii) | जिवापाड प्रेम करणे | (२) | गोंधळून जाणे |
| (३) | आकर्षित करणे | ||
Concept: वाक्प्रचार व म्हणी
समानार्थी शब्द लिहा:
चित्त - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
समानार्थी शब्द लिहा:
मेघ - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:
मिरवणूक
Concept: व्याकरण
खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:
कठीण/कठीन/कठिण/कटीन
Concept: व्याकरण
खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा:
| विरामचिन्हे | विरामचिन्हांची नावे |
| ? | ______ |
| . | ______ |
Concept: विरामचिन्हे
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)

- टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
Concept: अपठित गद्यांश
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | 'अंकिला मी दास तुझा' |
| 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| 2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
| 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' |
| 4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| 5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
Concept: अंकिला मी दास तुझा
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | योगी सर्वकाळ सुखदाता |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।। |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) उदक - |
| (ii) मधुर - | |
| (iii) तृषित - | |
| (iv) क्षाळणे - |
Concept: योगी सर्वकाळ सुखदाता
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)
- माता धावून जाते ______
- धरणीवर पक्षिणी झेपावते ______
- गाय हंबरत धावते ______
- हरिणी चिंतित होते ______
|
अग्निमाजि पडे बाळू। तैसा धांवें माझिया काजा। सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
२. कोण ते लिहा. (२)
- परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
- मेघाची विनवणी करणारा - ______
- भुकेलेले - ______
- भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______
३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)
४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)
Concept: अंकिला मी दास तुझा
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| कृती | ‘अंकिला मी दास तुझा’ |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - | ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’ |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) माता - |
| (ii) कनवाळू - | |
| (iii) काज - | |
| (iv) धेनू - |
Concept: अंकिला मी दास तुझा
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
-
उताऱ्यात आलेले नदीचे नाव -
-
बाळाची आई करत असलेला उद्योग -
|
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

(3) स्वमतः (3)
‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
Concept: शाल
उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
१. वैशिष्ट्ये लिहा: (२)
- कृष्णा नदीचा प्रवाह → ______
- टोपलीत ठेवलेले मूल → ______
- लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → ______
- कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → ______
|
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
२. प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा: (२)
- सन्मानाची प्रतीके लिहा.
- पाचपन्नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात?
३. व्याकरण:
(i) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा: (१)
(अ) ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गाजणे → ______
(ब) शाल, कृष्णा, पर्वत, नदी → ______
(ii) अनेकवचन लिहा: (१)
(अ) टोपली - ______
(ब) मासा - ______
४. स्वमत: (२)
लेखक - रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक 'उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Concept: शाल

