English

Revision: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board

Advertisements

Definitions [6]

व्याख्या लिहा.

खंडीभवन

खंडीभवन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून यात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे किंवा खंड होऊन प्रत्येक तुकडा/खंड नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो.

व्याख्या लिहा.

शाकीय प्रजनन

शाकीय प्रजनन हा वनस्पतींमधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून त्यात मूळ, खोड, पाने आणि मुकूल यांसारख्या शाकीय भागांपासून नवजात वनस्पतींची निर्मिती होते.

व्याख्या लिहा.

पुनर्जनन

अलैंगिक प्रजननाच्या या प्रकारात, सजीवाच्या शरीराचे तुकडे होतात आणि त्यानंतर प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होऊन पूर्ण नवजात सजीव/प्राणी निर्माण होतात.

व्याख्या लिहा.

फलन

एकगुणी पुंयुग्मकाचा (n) एकगुणी स्त्रीयुग्मकांशी (n) संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची (2n) निर्मिती होते, यालाच फलन असे म्हणतात.

परागणाची व्याख्या लिहा.

परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण म्हणतात.

व्याख्या लिहा.

पुष्पवृंत

फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला 'पुष्पवृंत' म्हणतात.

Important Questions [20]

Advertisements
Advertisements
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×