SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 25th June 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
- सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सुचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही तसेच या कृती लिहून येऊ नयेत.
- विभाग 5 - उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) पुढील विधाने चूक का बरोबर ते लिहा: 2
- पुण्याला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेले.
- बाळ थंडीने कुडकुडत रडत होते.
- लेखकाने पाचपन्नास रुपयांच्या नोटा व शाल बाईला दिली.
- बाई तिचे छोटे मूल एका झाडाखाली ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती.
|
पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. |
(2) आकृती पूर्ण करा: 2

(3) स्वमत: 3
‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
Chapter:
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: 2

| सुश्रुत | तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, “आपण ‘साहस कथा’ शिकूया.” |
| कथा | अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. |
| सुश्रुत | तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना - |
| कथा | य. गो. जोशी, वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व. पु. काळे, शंकर पाटील, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल, द. मा. मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखक, लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. |
| सुश्रुत | कित्ती सुंदर! आता ही ताई कोण बरं? |
| कादंबरी | काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा! |
(2) कोण ते लिहा: 2
- कथेची थोरली बहीण -
- ललितकलांचा पाया असलेली -
(3) स्वमत: 3
पुस्तकांशी मैत्री केल्यामुळे होणारे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: 2

|
ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. विद्या ही दुधारी तलवारीसारखी असते. विद्येने दुष्टांचा संहार करता येतो व दुष्टांपासून रक्षणही करता येते. माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणयुक्त असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मीयता. विद्येबरोबर या चार पारमिता असल्या पाहिजेत, तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबर मानवाजवळ करुणा नसली तर तो दानव आहे, असं मी समजतो. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री या पंचतत्त्वांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले, तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. |
(2) योग्य जोड्या लावा: 2
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) करुणेशिवाय मानव | (अ) विद्या |
| (ii) दुधारी तलवार | (ब) अन्नाची जरुरी |
| (iii) मानवजातीसंबंधी प्रेमभाव | (क) दानव |
| (iv) मनुष्यप्राणी | (ड) करुणा |
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: 2
- धान्य न देणारा - .......
- पाण्याच्या तुषारांचा रंग - .......
|
फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी... धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी... रंग मजेचे, रंग उद्याचे उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी... रंग मजेचे, रंग उद्याचे डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी? रंग मजेचे, रंग उद्याचे मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी... रंग मजेचे, रंग उद्याचे हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी... रंग मजेचे, रंग उद्याचे |
(2) एका वाक्यात उत्तरे लिहा: 2
- यंत्रांच्या संगतीने काय काय मिळेल?
- वृष्टी कोठून होईल?
(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा: 2
- अनोखी - ......
- सृष्टी - ......
- पुष्टी - ......
- तुष्टी - ......
(4) काव्यसौंदर्य: 2
‘पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवले पाहिजे’ या विधानावर तुमचे मत स्पष्ट करा.
Chapter:
पुढील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | स्वप्न करू साकार |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) विभव - |
| (ii) हस्त - | |
| (iii) मंगल - | |
| (iv) चक्र - |
Chapter:
पुढील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | अंकिला मी दास तुझा |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. |
सवेंचि झेंपावें पक्षिणी पिलीं पडतांचि धरणीं |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) काज - |
| (ii) धेनू - | |
| (iii) कनवाळू - | |
| (iv) मेघ - |
Chapter:
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
Chapter: [4.2] मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
Chapter: [8.2] जाता अस्ताला (स्थूलवाचन)
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
Chapter: [12.2] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा:
मुलांनी नेहमी खरे बोलावे.
Chapter:
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:
खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? (विधानार्थी करा.)
Chapter:
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:
तू फारच छान गातेस. (उद्गारार्थी करा.)
Chapter:
Advertisements
पुढील वाक्म्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
भुरळ पडणे
Chapter:
पुढील वाक्म्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
तथ्य असणे.
Chapter:
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
सुरुंग लावणे.
Chapter:
पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:
आवाज = .......
Chapter:
पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:
डोळे = ......
Chapter:
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा:
सावध × .......
Chapter:
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अवघड × ......
Chapter: [18] व्याकरण विभाग
खालील शब्दाचे वचन बदला.
घड्याळ - ......
Chapter: [18] व्याकरण विभाग
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तु उत्तम नागरीक आहेस.
Chapter: [18] व्याकरण विभाग
Advertisements
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.
Chapter: [18] व्याकरण विभाग
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा:
मग कसलं वजन उतरवणार तुम्ही
Chapter:
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा:
“शाबास चांगले काम केलेस”
Chapter:
|
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ ‘वनश्री ट्रस्ट’ तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप दिनांक - 5 जून संपर्क - व्यवस्थापक, वनश्री ट्रस्ट, सहकारनगर, पुणे. |
अनिल/आशा साने, ज्ञानदीप विद्यालय, पुणे, विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Chapter:
|
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ ‘वनश्री ट्रस्ट’ तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप दिनांक - 5 जून संपर्क - व्यवस्थापक, वनश्री ट्रस्ट, सहकारनगर, पुणे. |
अनिल/आशा साने, ज्ञानदीप विद्यालय, पुणे, विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत वनश्री ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Chapter:
खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. विद्या ही दुधारी तलवारीसारखी असते. विद्येने दुष्टांचा संहार करता येतो व दुष्टांपासून रक्षणही करता येते. माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणयुक्त असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मीयता. विद्येबरोबर या चार पारमिता असल्या पाहिजेत, तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबर मानवाजवळ करुणा नसली तर तो दानव आहे, असं मी समजतो. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री या पंचतत्त्वांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले, तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. |
Chapter:
पुढील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा:
तयार (रेडिमेड) कपड्यांचे दुकान
Chapter:
‘जागृती विद्यालय’, वरळी, मुंबई या शाळेत ‘मराठी भाषादिन’ साजरा झाला, या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
Chapter:
पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:
| खाद्यपदार्थ विक्रेता - चौकात गाडीवर पदार्थांची विक्री - जाहिरात - खाद्यपदार्थांचे वर्णन - लोकांची खरेदी - पदार्थांची स्तुती - एक मुलगा - गप्प उभा - गाडीवानाची विचारणा - काय हवे? - मुलाचे उत्तर, पदार्थांच्या वासानेच पोट भरले - ‘पदार्थांच्या वासाने पोट भरले याची किंमत दे’ - चतुर मुलाचे उत्तर, “वासाने जसे पोट भरले तशी नाण्यांच्या आवाजाने किंमत मिळव.” |
Chapter:
|
आनंदनिकेतन प्रशाला रत्नागिरी - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा - - पारितोषिक वितरण समारंभ - दि. 20 मार्च दुपारी 4 वाजता प्रमुख पाहुणे - श्री. नीरज शिंदे अध्यक्ष - श्री. कुणाल पटेल |
वरील प्रसंगी तुम्ही विजेते स्पर्धक या नात्याने उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Chapter:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

Chapter:
‘कचऱ्याचे व्यवस्थापन - काळाची गरज’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.
How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
