Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | स्वप्न करू साकार |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) विभव - |
| (ii) हस्त - | |
| (iii) मंगल - | |
| (iv) चक्र - |
Complete the Table
Advertisements
Solution
| मुद्दे | स्वप्न करू साकार |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | किशोर पाठक |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय | देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे. |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | आमचा भारत देश समृद्ध करून, या जगाचे वैभव आणि दौलत लाखो वेळा वाढवू आणि त्यांची जोपासना करू. |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | या देशभक्तिपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवीने मार्गदर्शन केले आहे. हे करताना कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे. नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली. |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) विभव - वैभव |
| (ii) हस्त - हात | |
| (iii) मंगल - पवित्र | |
| (iv) चक्र - चाक |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
