Advertisements
Advertisements
Question
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: 2

| सुश्रुत | तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, “आपण ‘साहस कथा’ शिकूया.” |
| कथा | अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. |
| सुश्रुत | तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना - |
| कथा | य. गो. जोशी, वि. स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व. पु. काळे, शंकर पाटील, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल, द. मा. मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखक, लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. |
| सुश्रुत | कित्ती सुंदर! आता ही ताई कोण बरं? |
| कादंबरी | काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा! |
(2) कोण ते लिहा: 2
- कथेची थोरली बहीण -
- ललितकलांचा पाया असलेली -
(3) स्वमत: 3
पुस्तकांशी मैत्री केल्यामुळे होणारे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
Comprehension
Advertisements
Solution
(1)

(2)
- कथेची थोरली बहीण - कादंबरी
- ललितकलांचा पाया असलेली - कथा
(3)
पुस्तकांसारखा खरा मित्र जगात दुसरा कोणी नाही. पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे जीवन अधिक समृद्ध बनवणे होय. पुस्तके निःस्वार्थ असतात; ती आपल्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाहीत. जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा ती सहज उपलब्ध होतात. आपण त्यांना कुठेही सोबत घेऊ शकतो. ती कधी तक्रार करत नाहीत किंवा हट्ट धरत नाहीत.
पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान आणि माहिती मिळते तसेच मनोरंजनही होते. ती आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि चांगले संस्कार देतात. विविध देशांची सफरही पुस्तकांच्या माध्यमातून करता येते. त्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते. म्हणूनच पुस्तकांशी घट्ट आणि कायमची मैत्री करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
