SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 20th February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना :-
- सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच कृती लिहून घेऊ नयेत.
- विभाग - 5 उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. 1. (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: (2)

|
क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. |
(2) चौकटी पूर्ण करा: (2)
- भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग − ................
- नदीसारखी प्रवाही − ................
(3) स्वमत: (3)
‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: (2)
- झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण ................
- झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण .............
|
जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच-सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खादय असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. |
(2) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा: (2)
- पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात –
- आसपासचे लाखो पक्षी आपण ओळखू शकतो –
- आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे –
- आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल –
(3) स्वमत: (3)
आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा: (2)

|
काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेले त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं तें सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं. कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च’ पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो. |
(2) आकृती पूर्ण करा: (2)

Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

|
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तौंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
(2) आकृती पूर्ण करा: (2)

(3) खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: (2)
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही॥
(4) काव्यसौंदर्य: (2)
खालील काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा:
‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
| ‘भरतवाक्य’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − | ....................... |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय− | ....................... |
| (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ....................... |
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
| ‘आश्वासक चित्र’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − | ....................... |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय− | ....................... |
| (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ....................... |
Chapter:
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
Chapter: [19] तू झालास मूक समाजाचा नायक (कविता)
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
Chapter: [5.2] बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन)
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
Chapter: [20.2] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
योग्य जोड्या लावा:
| सामासिक शब्द | समासाचे नाव |
| (i) नीलकमल | द्विगू समास |
| (ii) नवरात्र | कर्मधारय समास |
| वैकल्पिक द्वंद्व समास |
Chapter:
दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा:
(कारागिरी, हुरहूर, लाललाल, अतिरेक)
| प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
Chapter:
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
सटकी मारणे
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
Advertisements
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कान देऊन ऐकणे
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पित्त खवळणे.
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अचंबित होणे.
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
समानार्थी शब्द लिहा.
घर
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
नदी
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
इमानदार - [इमान व दार हे शब्द वगळून)
Chapter:
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
सहानूभूती/सहानुभूती/सहानुभुती/सहानुभूति
Chapter:
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
अभिव्यक्ती/अभीव्यक्ती/अभिव्यक्ति/अभीव्यक्ति
Chapter:
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
क्रियाशिल/क्रीयाशील/क्रियाशील/क्रीयाशिल
Chapter:
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
कितर्न/किर्तन/कीर्तन/कीतर्न
Chapter:
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
शिरोधार्य/शीरोधार्य/शीरोर्धाय/शिरोर्धाय
Chapter:
Advertisements
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा:
आर्शिवाद/आर्शीवाद/आशिर्वाद/आशीर्वाद
Chapter:
पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| ? | ............. |
Chapter:
पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| ! | ............. |
Chapter:
खालील शब्दाला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:
Bio-data
Chapter:
खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
Mobile
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
|
ज्ञानसागर पुस्तकालय
सवलत दिनांक - 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर |
भाग्येश/भाग्यश्री शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
|
ज्ञानसागर पुस्तकालय
सवलत दिनांक - 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर |
भाग्येश/भाग्यश्री शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना राबवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Chapter:
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेले त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं तें सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं. कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च’ पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो. |
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘फळांच्या दुकानाची’ आकर्षक जाहिरात तयार करा.

Chapter:
खालील विषयावर बातमी तयार करा:
‘ज्ञानदीप विद्यालय’, वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:
शालेय सहलीचे नियोजन - विदयार्थ्यांमध्ये उत्साह - प्रत्यक्ष सहलीचा दिवस उगवणे - सहलीला सुरुवात - गाडीचा डोंगर-दऱ्यांतून प्रवास - अचानक पाऊस - चालकाचे प्रसंगावधान - विदयार्थ्यांचे सहकार्य - वैशिष्ट्यपूर्ण, अविस्मरणीय प्रसंग - एकीचे दर्शन.
Chapter:
|
आंतरशालेय कबड्डी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दि. 24 डिसेंबर वेळ - दु. 4.00 प्रमुख पाहुणे - श्रीमती रेखा विचारे अध्यक्ष - श्रीमती विदुला पवार |
वरील समारंभास प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Chapter:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Chapter:
‘झाडे लावा-झाडे जगवा’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi [मराठी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi [मराठी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
