English

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: ‘आश्वासक चित्र’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − (ii) प्रस्तुत कवितेचा विषय− (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

  ‘आश्वासक चित्र’ 
(i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − .......................
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय− .......................
(iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे .......................
Complete the Table
Advertisements

Solution

  ‘आश्वासक चित्र’ 
(i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − निरजा
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय− भावंडांमधील प्रेम, निरागसपणा आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व.
(iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे या कवितेत स्त्री-पुरुष समानतेच्या आश्वासक भविष्यातील सार्वकालिक चित्र रेखाटले आहे. कवयित्रीने आशय मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी ‘मुक्तछंद’चा वापर केला असून त्यामुळे कवितेतील वास्तव थेट मनाला स्पर्श करते. संपूर्ण कवितेत स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांची प्रभावी जाणीव करून दिली आहे. साधी, सरळ आणि संवादात्मक भाषाशैली कवयित्रीचे विचार सहज व परिणामकारक रीतीने मांडते. आधुनिक स्त्रीचा स्वकर्तृत्वावर असलेला विश्वास, आव्हानांना सामोरे जाण्याची तिची तयारी आणि तिच्या असामान्य क्षमतांचे चित्रण या कवितेत केले आहे. तसेच, स्त्रीच्या या गुणांचा सन्मान करून स्वतःची मानसिकता व वर्तन बदलणाऱ्या पुरुषाचे चित्रण भविष्यासंबंधी सकारात्मक भावना निर्माण करते. ‘भातुकली’ आणि ‘चेंडू’ यांसारख्या समर्पक प्रतिमांचा वापर वाचकाला चिंतन करण्यास प्रवृत्त करतो. म्हणूनच ही कविता मला अत्यंत आवडते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×