English

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) आकृती पूर्ण करा: क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा:  (2)

क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे.

भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे.

(2) चौकटी पूर्ण करा:  (2)

  1. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग − ................
  2. नदीसारखी प्रवाही − ................

(3) स्वमत:  (3)

‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

Comprehension
Advertisements

Solution

(1) 

(2)

  1. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग – शब्दांची व्युत्पत्ती शोधणे
  2. नदीसारखी प्रवाही – भाषा

(3) गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. आपल्या मराठी भाषेत समृद्ध आणि अर्थपूर्ण शब्दसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे जिथे योग्य मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे परकीय शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. असे केल्याने भाषेची शुद्धता आणि गोडवा टिकून राहतो. उदाहरणार्थ, “मी स्टडी केली” असे म्हणण्याऐवजी “मी अभ्यास केला” असे म्हणणे योग्य आहे. तसेच “थँक्यू” ऐवजी “धन्यवाद” आणि “सॉरी” ऐवजी “माफ करा” असे म्हणणे अधिक योग्य वाटते. तथापि, काही तांत्रिक किंवा नव्या संकल्पनांसाठी मराठी पर्याय उपलब्ध नसतील, तर तेथे परकीय शब्दांचा मर्यादित वापर स्वीकारता येईल. पण शक्य तितका मराठी शब्दप्रयोग करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान आणि समृद्धी टिकून राहील.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×