English

खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेले त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेले त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्‍वास वाटू लागतो. तुम्हांला हवं तें सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.

कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’च’ पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.

Writing Skills
Advertisements

Solution

इतरांपेक्षा अधिक देण्याची व अपेक्षेपेक्षा जास्त काम करण्याची तयारी असणारी व्यक्ती वेगळी ठरते. अशा व्यक्तीवर लोकांचा आदर व विश्वास वाढतो आणि तिला सहकार्य मिळते. अधिक कष्ट व प्रामाणिक प्रयत्नांमुळे स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो आणि यश प्राप्त होते. कामाची माणसे सर्वांना हवी असतात; मात्र काही जण काम टाळून यश पुढे ढकलतात व संधी गमावतात. त्यामुळे यश मिळवायचे असेल तर तत्परतेने काम करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×