English

Marathi [मराठी] Official Board Paper 2024-2025 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Marathi [मराठी] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 24th June 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना:

  1. सूचनेनुसार आकलनकृती व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेनानेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन) आकृतींची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
  4. विभाग 5 उपयोजित लेखन, प्रश्‍न 5. (अ) (2) या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्‍न 1. (इ) मधील अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहायचा आहे.
  5. स्वच्छता, नीटनेटकेपणा लेखननिमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग 1 : गद्य
पठित गद्य
[7]1. (अ)

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा: 2

सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती.

जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!

आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राथूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची.

(2) कोठे ते लिहा: 2

  1. लेखिकेची पुस्तकांच्या गराड्यात बसण्याची जागा -
  2. पोपटांचे थवे उतरायचे ठिकाण - 

(3) स्वमत: 

पुस्तकांची वाट पाहण्याचा लेखिकेचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. 3

Concept: undefined - undefined
Chapter:
[7]1. (आ)

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) उत्तरे लिहा: 2

(i) गुणवैशिष्ट्ये लिहा:

वन्यपशूंचे दात

(ii) कारण लिहा:

सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली.

सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे.

सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात “छोना, छोना तू काय कत्ते?” असं म्हणून तासन्‌तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.

(2) कोण ते लिहा: 2 

  1. पितळी पातेल्याची चाळणी करणारी - .......
  2. “छोना, छोना तू काय कत्ते?” असे म्हणणारी - .......

(3) स्वमत: 3

‘पशूंनाही भावना असतात’ या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. 

Concept: undefined - undefined
Chapter:
अपठित गद्य
[4]1. (इ)

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृतिबंध पूर्ण करा: 2

ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वतःच्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसूया, पिकवूया. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.

(2) उत्तरे लिहा: 2

(i) अज्ञानामुळे जगात निर्माण होणारे -

(अ) .........   

(आ) .......

(ii) सर्वांसाठी असणारे सृष्टीतील घटक -

(अ) .........   

(आ) .......

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग 2 : पद्य
[8]2. (अ)

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) तुलना करा: 2

पिंजऱ्यातील पोपट पिंजर्‍याबाहेरील पोपट
(i) ......... (i) .........
(ii) ......... (ii) .........

 

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया

फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलुप झाली काया

हा कुठवर वेड्या घेसी आसरा

तुज पंख दिले देवाने

कर विहार सामर्थ्याने

दरि-डोंगर, हिरवी राने

जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते

तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते

का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले

श्रमदेव घरी अवतरले 

घर प्रसन्नतेने नटले

हा योग जीवनी आला साजिरा

(2) योग्य पर्याय ओळखा: 2

(i) सुखलोलुप झाली काया म्हणजे ......

(अ) सुखाचा तिरस्कार वाटणे.

(आ) सुखाबद्दल प्रेम वाटणे.

(इ) सुखाचे आकर्षण वाटणे.

(ई) सुख उपभोगण्याची सवय लागणे.

(ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ......

(अ) काया सुखलोलुप होते.

(आ) पाखराला आनंद होतो.

(इ) आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.

(ई) आकाशाची प्राप्ती होते.

(3) पुढील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: 2

‘घामातुन मोती फुलले 

श्रमदेव घरी अवतरले 

घर प्रसन्नतेने नटले 

हा योग जीवनी आला साजिरा.’ 

(4) काव्यसौंदर्य: 2

‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (आ) | खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
[4]2. (आ) (i)

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

‘तू झालास मूक समाजाचा नायक’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - .........
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - .........
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. मळवाट
  2. बळ
Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]2. (आ) (ii)

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

‘खोद आणखी थोडेसे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - .........
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - .........
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. आर्त
  2. रिता
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (इ)

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;

Concept: undefined - undefined
Chapter: [12] भरतवाक्य (कविता)
विभाग 3 : स्थूलवाचन
[6]3. | पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[3]3. (1)

सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
[3]3. (2)

खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. 

Concept: undefined - undefined
Chapter: [10.2] मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)
[3]3. (3)

गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5.2] बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन)
विभाग 4 : भाषाभ्यास
[8]4. (अ) | व्याकरण घटकांवर आधारित कृती:
[2]4. (अ) (1) | समास

योग्य जोड्या लावा:

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) काव्यामृत वैकल्पिक द्वंद्व समास
(ii) बारभाई कर्मधारय समास
  द्‌विगू समास
Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (अ) (2) | शब्दसिद्धी

पुढील तक्ता पूर्ण करा:

[कडवट, उपवास, चढाई, अचूक]

प्रत्ययघटित  उपसर्गघटित अभ्यस्त
     
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (अ) (3) | वाक्प्रचार:
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून, त्यांचा वाक्यांत उपयोग करा:
[2]4. (अ) (3) (i)

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

अचंबित होणे.

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
Advertisements
[2]4. (अ) (3) (ii)

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सार्थक होणे -

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4. (अ) (3) (iii)

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रतीक्षा करणे -

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4. (अ) (3) (iv)

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गुडघे टेकणे -

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[8]4. (आ) | भाषिक घटकांवर आधारित कृती:
[4]4. (आ) (1) | शब्दसंपत्ती
[0.5]4. (आ) (1) (i) (1)

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

अपेक्षा नसताना -

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[0.5]4. (आ) (1) (i) (2)

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

पसरवलेली खोटी बातमी -

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[0.5]4. (आ) (1) (i) (3)

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

उपकाराची जाणीव ठेवणारा - 

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]4. (आ) (1) (ii) (1)

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक × ......

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[0.5]4. (आ) (1) (ii) (2)

पुढील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

साक्षर × ......

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]4. (आ) (1) (iii) (1)

पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:

सूर्य = ......

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]4. (आ) (1) (iii) (2)

पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:

पाणी = ......

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (आ) (1) (iv)

पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:

जीवनचरित्र - (जीवन व चरित्र हे शब्द वगळून.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4. (आ) (2) | लेखननियमांनुसार लेखन:
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा: (कोणतीही दोन)
[1]4. (आ) (2) (i)

पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

शिक्षणामुळे माणुस सूसंस्कृत होतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (आ) (2) (ii)

पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

स्त्री ही स्वाभीमानी असली पाहीजे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (आ) (2) (iii)

पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

ही फूले तिन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]4. (आ) (2) (iv)

पुढील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

संतांनी ही मानवता आर्वजून शीकवली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4. (आ) (3) | विरामचिन्हे:
[0.5]4. (आ) (3) (i)

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

“    ”

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[0.5]4. (आ) (3) (ii)

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

,

Concept: undefined - undefined
Chapter: [22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4. (आ) (4) | पारिभाषिक शब्द:
[0.5]4. (आ) (4) (i)

पुढील शब्दाला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:

Goodwill - .......

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग 5 : उपयोजित लेखन
[6]5. (अ) | पुढील कृती सोडवा:
[6]5. (अ) (1) | पत्रलेखन:

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’

‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे योगासन शिबिर विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

नाममात्र प्रवेश फी

तज्ज्ञ प्रशिक्षक

स्थळ - क्रीडासंकुल सभागृह क्र. 0१

दि. १५ जून ते २० जून

वेळ: सकाळी ७.०० ते ९.००

संपर्क - [email protected] आयोजक

विदयार्थी प्रमुख या नात्याने - तुमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा:
[6]5. (अ) (1) (i)

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’

‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे योगासन शिबिर विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

नाममात्र प्रवेश फी

तज्ज्ञ प्रशिक्षक

स्थळ - क्रीडासंकुल सभागृह क्र. 0१

दि. १५ जून ते २० जून

वेळ: सकाळी ७.०० ते ९.००

संपर्क - [email protected] आयोजक

विदयार्थी प्रमुख या नात्याने - तुमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[6]5. (अ) (1) (ii)

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’

‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे योगासन शिबिर विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

नाममात्र प्रवेश फी

तज्ज्ञ प्रशिक्षक

स्थळ - क्रीडासंकुल सभागृह क्र. 0१

दि. १५ जून ते २० जून

वेळ: सकाळी ७.०० ते ९.००

संपर्क - [email protected] आयोजक

विदयार्थी प्रमुख या नात्याने - तुमच्या शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांची या शिबिरासाठी तज्ज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]5. (अ) (2)

उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वतःच्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसूया, पिकवूया. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.
Concept: undefined - undefined
Chapter:
[10]5. (आ) | पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा: (शब्दमर्यादा प्रकारानुसार 60 ते 90 शब्द)
[5]5. (आ) (1) | जाहिरातलेखन:

पुढील शब्दांचा वापर करून आकर्षक जाहिरात तयार करा:

संगणक वर्ग काळाची गरज माफक फी सरावाची संधी
Concept: undefined - undefined
Chapter:
[5]5. (आ) (2) | बातमीलेखन:

पुढील विषयावर बातमी तयार करा:

दि. ५ जून - पर्यावरण दिनानिमित्त ‘प्रगती विद्यालय’, मोरगाव येथे मा. मुख्याध्यापक यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]5. (आ) (3) | कथालेखन:

पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा:

(दिलेली कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)

आम्हां भावंडांचा खूप चर्चेनंतर एकदाचा सहलीला जाण्याचा बेत पक्का झाला. सगळ्यांची मोट बांधेपर्यंत मेटाकुटीला आलो होतो. जाण्याचा दिवस उजाडला. अत्यंत उत्सुकतेने हसतखिदळत प्रवासाला सुरुवात झाली. नागमोडी वळणे घेत दाटीवाटीने असलेल्या झाडांमधून वाट काढत बस जात होती. अखेर पर्यटकांचे स्वागत करणारी ती कमान दिसली. कमानीतून बस आत शिरताच समोर पाहतो तर ................................................................................................................. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5. (इ) | पुढील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती स्रोडवा:
[8]5. (इ) (1) | प्रसंगलेखन:

अक्षरस्पर्श वाचनालय, पुणे

आयोजित आंतरशालेय कथाकथन स्पर्धा

पारितोषिक वितरण समारंभ

सुप्रसिद्ध कथाकथनकार

श्री. विनय परांजपे यांच्या हस्ते

दि. १० डिसेंबर

वेळ - दुपारी ४.०० वा. 

स्थळ - अक्षरस्पर्श वाचनालय, कर्वे पथ, पुणे

वरील प्रसंगी तुम्ही पारितोषिक प्राप्त विद्यार्थी म्हणून उपस्थित होता, अशी कल्पना करून वरील प्रसंगाचे वर्णन करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5. (इ) (2) | आत्मकथन:

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5. (इ) (3) | वैचारिक लेखन:

‘रक्‍तदान श्रेष्ठ दान’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Marathi [मराठी] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi [मराठी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi [मराठी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×