Advertisements
Advertisements
Question
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) तुलना करा: 2
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजर्याबाहेरील पोपट |
| (i) ......... | (i) ......... |
| (ii) ......... | (ii) ......... |
|
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव, माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरि-डोंगर, हिरवी राने जा ओलांडुनी या सरिता-सागरा |
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा |
(2) योग्य पर्याय ओळखा: 2
(i) सुखलोलुप झाली काया म्हणजे ......
(अ) सुखाचा तिरस्कार वाटणे.
(आ) सुखाबद्दल प्रेम वाटणे.
(इ) सुखाचे आकर्षण वाटणे.
(ई) सुख उपभोगण्याची सवय लागणे.
(ii) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ......
(अ) काया सुखलोलुप होते.
(आ) पाखराला आनंद होतो.
(इ) आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.
(ई) आकाशाची प्राप्ती होते.
(3) पुढील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: 2
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा.’
(4) काव्यसौंदर्य: 2
‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Advertisements
Solution
(1)
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजर्याबाहेरील पोपट |
| (i) पारतंत्र्यात राहतो. | (i) स्वातंत्र्य उपभोगतो. |
| (ii) लौकिक सुखात रमतो. | (ii) स्वबळाने संचार करतो. |
(2)
- सुखलोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागणे.
- पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.
(3) घाम गाळल्यावरच शेतात मोत्यासारखी धान्ये पिकतात आणि पिके भरभराटीला येतात. हा कष्टांच्या रूपातील ईश्वराचा अद्भुत चमत्कारच आहे. मेहनतीने मिळवलेले धान्य म्हणजे श्रमदेवाचे आपल्या घरात झालेले आगमन होय. त्याच वेळी घरात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदते. कष्टांमुळेच आयुष्यात असे गोड आणि सुंदर क्षण अनुभवायला मिळतात. त्यामुळे श्रमाचे महत्त्व ओळख आणि स्वातंत्र्याचे खरे मोल समजून घे.
(4)
‘आकाशी झेप घे रे’ या कवितेत कवी जगदीश खेबुडकर यांनी परावलंबित्वात समाधान मानणाऱ्या पाखराला, म्हणजेच माणसाच्या गुलाम मनाला, महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांनी स्वातंत्र्याचे खरे मूल्य समजावून सांगत माणसाला स्वतंत्रपणे जगण्याची प्रेरणा दिली आहे.
या ओळींचा अर्थ असा की पाखराला मुक्तपणे आकाशात उंच भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता आणि संपत्ती हे जगातील आकर्षक पण बंधनकारक असे सोन्याचे पिंजरे आहेत. या पिंजऱ्यात अडकलेल्या जीवाची प्रगती थांबते आणि त्याची उन्नती होत नाही. सुखसोयींमध्ये अडकून माणसाचे कर्तृत्व कमी होते. म्हणूनच हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या आणि उंच आकाशात झेप घे, असा मोलाचा उपदेश कवीने केला आहे. या ओळीतून स्वातंत्र्याची आत्मिक शिकवण स्पष्टपणे दिसून येते.
