English

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) उत्तरे लिहा: 2 (i) गुणवैशिष्ट्ये लिहा: वन्यपशूंचे दात (ii) कारण लिहा: सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) उत्तरे लिहा: 2

(i) गुणवैशिष्ट्ये लिहा:

वन्यपशूंचे दात

(ii) कारण लिहा:

सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली.

सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे.

सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात “छोना, छोना तू काय कत्ते?” असं म्हणून तासन्‌तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.

(2) कोण ते लिहा: 2 

  1. पितळी पातेल्याची चाळणी करणारी - .......
  2. “छोना, छोना तू काय कत्ते?” असे म्हणणारी - .......

(3) स्वमत: 3

‘पशूंनाही भावना असतात’ या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. 

Comprehension
Advertisements

Solution

    1. वन्यपशूंच्या दातांत खूप ताकद असते व त्यात चिवटपणा असतो.
    2. सोनाली पेशंट असलेल्या गृहस्थाच्या अंगावर धावली; कारण त्याने दीपालीला घाईघाईने उचलले होते.
    1. पितळी पातेल्याची चाळणी करणारी - सोनाली
    2. “छोना, छोना तू काय कत्ते?” असे म्हणणारी - दीपाली
  1. बाबा आमटे यांच्या आनंदवनात त्यांचे कुटुंबीय, अगदी लहान नातवंडेसुद्धा प्राण्यांसोबत खेळताना आणि रममाण होताना दिसतात. तेथे पाळीव तसेच हिंस्र अशा दोन्ही प्रकारचे प्राणी त्यांच्या आजूबाजूला मुक्तपणे वावरताना आढळतात. आपण प्राण्यांवर प्रेम केले, तर तेही आपल्याशी निष्ठावान राहतात. जसे आपण समोरच्या व्यक्तीच्या भावनांना त्याच भावनेने प्रतिसाद देतो, तसेच प्राणीही आपल्या वागणुकीला प्रतिसाद देतात. आपण त्यांना त्रास दिला किंवा दूर लोटले, तर ते दुखावतात; परंतु प्रेमाने सांभाळले, तर तेही आपुलकी दाखवतात. सोनाली ही सिंहीण आणि रूपाली ही कुत्री असूनही त्यांचा लेखकाच्या घरातील मुक्त वावर आणि घरातील सदस्यांबद्दलचे प्रेम प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. त्यामुळे हे विधान खरे असल्याचा मला ठाम विश्वास आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×