English

उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वतःच्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसूया, पिकवूया. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात.
Writing Skills
Advertisements

Solution

सृष्टी आपल्याला देण्याची आणि सर्वांनी मिळून उपभोग घेण्याची शिकवण देते. मेघ, झाडे, फुले, नद्या, सूर्य-चंद्र सर्व काही नि:स्वार्थपणे देतात. परंतु मनुष्य मात्र जमीन व संपत्तीवर स्वतःचा हक्क सांगून भिंती उभारतो. या अज्ञानामुळेच जगात अशांती, द्वेष आणि मत्सर निर्माण होतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×