English

वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आकृतीच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. पक्ष: square साध्य: square सिद्धता:

Advertisements
Advertisements

Question

वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आकृतीच्या आधारे खालील कृती पूर्ण करा.

पक्ष: `square`

साध्य: `square`

सिद्धता:  

त्रिज्या AP आणि AQ काढून प्रमेयाची खाली दिलेली सिद्धता रिकाम्या जागा भरून पूर्ण करा.

ΔPAD आणि ΔQAD यांमध्ये,

बाजू PA ≅ बाजू `square` ...........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

बाजू AD ≅ बाजू AD ...............[`square`]

∠APD ≅ ∠AQD = 90°  ............[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ ΔPAD ≅ ΔQAD ..................[`square`]

∴ बाजू DP ≅ बाजू DQ ...............[`square`]

Sum
Advertisements

Solution

पक्ष: A हे वर्तुळाचे केंद्र आहे. वर्तुळाला बाह्यभागातील D बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड वर्तुळाला P व Q बिंदूवर स्पर्श करतात.

साध्य: बाजू DP ≅ बाजू DQ

सिद्धता:  

त्रिज्या AP आणि AQ काढून प्रमेयाची खाली दिलेली सिद्धता रिकाम्या जागा भरून पूर्ण करा.

ΔPAD आणि ΔQAD यांमध्ये,

बाजू PA ≅ बाजू QA ...........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या] 

बाजू AD ≅ बाजू AD ...............[सामाईक बाजू]

∠APD ≅ ∠AQD = 90°  ............[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ ΔPAD ≅ ΔQAD ..................[कर्णभुजा कसोटी]

∴ बाजू DP ≅ बाजू DQ ...............[एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

shaalaa.com
स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q ५

RELATED QUESTIONS

आकृती मध्ये, केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर -

(1) रेख AP || रेख BQ हे सिद्ध करा.

(2) ΔAPR ~ ΔRQB हे सिद्ध करा.

(3) जर ∠PAR चे माप 35° असेल, तर ∠RQB चे माप ठरवा.


आकृती मध्ये, केंद्र A व B असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये स्पर्श करतात. रेषा l ही त्यांची सामाईक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील, तर रेख CD ची लांबी किती असेल?


सोबतच्या आकृतीत, बिंदू M वर्तुळकेंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = `6sqrt3` तर

(1) वर्तुळाची त्रिज्या काढा.

(2) ∠K आणि ∠M यांची मापे ठरवा.


आकृती मध्ये, बिंदू O वर्तुळकेंद्र आणि रेख AB व रेख AC हे स्पर्शिकाखंड आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या r असेल आणि l(AB) = r असेल, तर `square`ABOC हा चौरस होतो, हे दाखवा.


शेजारील आकृतीत, रेषा l ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS || रेषा l. जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. 


सोबतच्या आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळात रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते, तर ∠CAB चे माप किती अंश आहे? का? 

 


दिलेल्या आकृतीत, केंद्र D असलेले वर्तुळ ∠ACB च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर ∠ACB =  52°, तर ∠ADB चे माप काढा. 


खालील प्रमेय सिद्ध करा:

वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात.


दिलेल्या आकृतीत, Q केंद्र असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि PN स्पर्शिका आहेत. जर ∠MPN = 40°, तर ∠MQN चे माप काढा.


'O' केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्यबिंदूतून AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहे. जर OP = 12 सेमी व ∠OPA = 30°, तर वर्तुळाची त्रिज्या ______ असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×