Advertisements
Advertisements
Question
तुमचे मत नोंदवा.
मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
Advertisements
Solution 1
- युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले; परंतु त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे या मार्गाने झाला.
- हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवरायांनी ओळखले.
- परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी नौदल उभारले, जलदुर्गांची बांधणी केली.
- इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली.
- संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवाद्यांना प्रखर विरोध केला.
- थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांचा पराभव केला.
- काळातील अन्य भारतीय राजे युरोपियन यापुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे घोरण नेहमीच वसाहतवाद विरोधी होते.
Solution 2
- छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बलाढ्य नौदल उभारले आणि जलदुर्ग बांधले; कारण त्यांना वसाहतवादी परकीयांच्या गुप्त मनसुब्यांची जाणीव होती.
- इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली.
- परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला.
- छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पाेर्तुगिजांचा पराभव केला.
- युरोपियन वसाहतवाद्यांविरुद्ध प्रतिकाराचे धोरण स्वीकारणारे मराठे हे एकमेव भारतीय शासक होते. त्यामुळे, मराठ्यांची धोरणे वसाहतवादविरोधी होती.
RELATED QUESTIONS
मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______
तुमचे मत नोंदवा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज
