हिंदी

तुमचे मत नोंदवा. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.

दीर्घउत्तर
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर १

  1. युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले; परंतु त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे या मार्गाने झाला.
  2. हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवरायांनी ओळखले.
  3. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी नौदल उभारले, जलदुर्गांची बांधणी केली.
  4. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली.
  5. संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवाद्यांना प्रखर विरोध केला.
  6. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांचा पराभव केला.
  7. काळातील अन्य भारतीय राजे युरोपियन यापुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे घोरण नेहमीच वसाहतवाद विरोधी होते.
shaalaa.com

उत्तर २

  1. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बलाढ्य नौदल उभारले आणि जलदुर्ग बांधले; कारण त्यांना वसाहतवादी परकीयांच्या गुप्त मनसुब्यांची जाणीव होती.
  2. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली.
  3. परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला.
  4. छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पाेर्तुगिजांचा पराभव केला.
  5. युरोपियन वसाहतवाद्यांविरुद्ध प्रतिकाराचे धोरण स्वीकारणारे मराठे हे एकमेव भारतीय शासक होते. त्यामुळे, मराठ्यांची धोरणे वसाहतवादविरोधी होती.
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - पोर्तुगीज - मराठे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 4 वसाहतवाद आणि मराठे
स्वाध्याय | Q ३.२ | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.


थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.


पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.

भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______


तुमचे मत नोंदवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×