Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
Advertisements
Solution 1
- नेत्र, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, यकृत, हाडे, मूत्रपिंडे व त्वचा यांसारखे अवयव मानवाला निरोगी राखण्यात व त्याच्या शरीरांतर्गत घडामोडी पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे मौल्यवान अवयव निकामी झाले किंवा शरीरातून काढून टाकले, तर माणूस सुरळीत जीवन जगू शकणार नाही.
- या अवयवांचे दान केल्यास एखाद्या गरजू माणसाचे आयुष्य सुसह्य होऊ शकते.
- वाढते वयोमान, अपघात, रोग, व्याधी इत्यादी कारणांमुळे ज्यांचे अवयव निकामी झालेले आहेत, अशा व्यक्तींना आपण मूत्रपिंड, त्वचा आदि ठरावीक अवयव दान करू शकतो.
- मरणोत्तरही यकृत, हृदय, डोळे यांसारख्या अवयवांचे दान करता येते.
म्हणूनच, मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल असतात.
Solution 2
- मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये - विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.
- या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.
Notes
Students should refer to the answer according to the question and marks.
RELATED QUESTIONS
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.
वेगळा घटक ओळखा.
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.
व्याख्या लिहा.
मूलपेशी
शास्त्रीय कारणे लिहा.
मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
