मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.

कारण सांगा
Advertisements

उत्तर १

  1. नेत्र, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, यकृत, हाडे, मूत्रपिंडे व त्वचा यांसारखे अवयव मानवाला निरोगी राखण्यात व त्याच्या शरीरांतर्गत घडामोडी पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे मौल्यवान अवयव निकामी झाले किंवा शरीरातून काढून टाकले, तर माणूस सुरळीत जीवन जगू शकणार नाही.
  2. या अवयवांचे दान केल्यास एखाद्या गरजू माणसाचे आयुष्य सुसह्य होऊ शकते.
  3. वाढते वयोमान, अपघात, रोग, व्याधी इत्यादी कारणांमुळे ज्यांचे अवयव निकामी झालेले आहेत, अशा व्यक्तींना आपण मूत्रपिंड, त्वचा आदि ठरावीक अवयव दान करू शकतो.
  4. मरणोत्तरही यकृत, हृदय, डोळे यांसारख्या अवयवांचे दान करता येते.
    म्हणूनच, मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल असतात.
shaalaa.com

उत्तर २

  1. मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये - विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.
  2. या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.
shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to the question and marks. 

मूलपेशी (Stem Cells)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा | Q 7

संबंधित प्रश्‍न

_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.


मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?


अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?


अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.


माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________


स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव


शास्त्रीय कारणे लिहा.

मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.


मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×