Advertisements
Advertisements
Question
कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.
Advertisements
Solution
गुरू इंडस्ट्रीज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ४५, गुरु टॉवर्स,
जे. एम. रोड, पुणे – ४११ ०२१.
CIN: L३०१२१ MH २००७ PLC०७०५०४
फोन: ०२०-१२११००७२
फॅक्स: ०२०-३००४००७७
संदर्भ क्र.: जी/डीईपी/०९/१९-२०
संकेतस्थळ: www.gurulimited.com
ई-मेल: [email protected]
दिनांक: १० एप्रिल २०१९
श्री. शरंगधर नाईक,
७८/६८, गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ,
पुणे – ४११ ०११.
विषय: ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार.
आदरणीय महोदय,
आपला दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजीचा ठेव गुंतवणूक रु. १,००,०००/- (अक्षरी रु. एक लाख फक्त) बाबतचा अर्ज मिळाला. जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेव २ वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झाली आहे.
आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत.
ठेवीचा तपशील खालीलप्रमाणे -
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | |
|
मुद्त ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम | ठेवीचा कालावधी | व्याजदर | बँकेचा तपशील | |
| बँकेचे नाव | खाते क्रमांक | ||||
| ६७८ | ₹ १,००,००० | २ वर्षे | १२.५% | सिटी बँक | २२२०४० |
कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दल संचालक मंडक्राने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो.
कळावे,
आपला विश्वासू,
गुरु इंडस्ट्रीज लि.
सही
(श्री. नितीन मोदी)
कंपनी चिटणीस
सोबत: ठेव पावती क्र. ६७८
