हिंदी

कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

गुरू इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४५, गुरु टॉवर्स,
जे. एम. रोड, पुणे – ४११ ०२१.
CIN: L३०१२१ MH २००७ PLC०७०५०४

फोन: ०२०-१२११००७२
फॅक्स: ०२०-३००४००७७
संदर्भ क्र.: जी/डीईपी/०९/१९-२०

संकेतस्थळ: www.gurulimited.com
ई-मेल: [email protected]
दिनांक: १० एप्रिल २०१९


श्री. शरंगधर नाईक,
७८/६८, गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ,
पुणे – ४११ ०११.

विषय: ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार.

आदरणीय महोदय,

आपला दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजीचा ठेव गुंतवणूक रु. १,००,०००/- (अक्षरी रु. एक लाख फक्त) बाबतचा अर्ज मिळाला. जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेव २ वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झाली आहे.

आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल  आपले आभारी आहोत.

ठेवीचा तपशील खालीलप्रमाणे -

1 2 3 4 5

मुद्त ठेव पावती क्रमांक

ठेव रक्कम ठेवीचा कालावधी व्याजदर बँकेचा तपशील
बँकेचे नाव खाते क्रमांक
६७८ ₹ १,००,००० २ वर्षे १२.५% सिटी बँक २२२०४०

कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दल संचालक मंडक्राने कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो.

कळावे,

आपला विश्वासू,
गुरु इंडस्ट्रीज लि.

सही        
(श्री. नितीन मोदी)
कंपनी चिटणीस

सोबत: ठेव पावती क्र. ६७८

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×