हिंदी

कर्जरोखे म्हणजे काय? - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कर्जरोखे म्हणजे काय?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजेच कर्जरोखे होय. दीर्घ व मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेआहे. कर्जरोखा (debenture) ही संज्ञा मूळ लॅटीन शब्द ‘डिबेर’ (debare) यापासून आली असून याचा अर्थ ‘ऋणी असणे’ असा होतो. 

कंपनी कायदा २०१३, कलम २ (३०) मध्ये फक्त असे नमूद केले आहे की, ‘कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही.’ 

यापरिभाषे अंतर्गत कर्जरोख्यांमध्ये कर्जरोखे साठ्याचाही समावेश केला आहे. कर्जरोखे म्हणजे असा दस्तावेज जो कर्जनिर्मिती करतो किंवा कर्जाची पोच देतो. साधारण सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा विना तारणही कर्जरोखे असू शकतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×