हिंदी

कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

रेनबो इंडस्ट्रीज लिमिटेड 

50/A, स्वामी नारायण रोड, तुंगा गाव, मुंबई - ७२,
CIN: L५०३०७MH २००० PLC १६०६९९

फोन: ०२२-२३६२६५३५
फॅक्स: ०२२-५१३६४२५२ 
संदर्भ: रेनबो/२७/२०१२-१३

http//:www.rainbowindustries.co.in 
ई-मेल: [email protected]
दिनांक: २ मे, २०१२

श्री. संजय पी. पाटील
स्मृती निवास, जिवा महाले रोड,
सांताक्रूझ (प), मुंबई - ५४.

विषय: कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन

महोदय, 

आपणास कळविण्यात येत आहे की, १२.५% दराचे १,००,००० परिवर्तनीय कर्जरोखेच्या वितरणाच्या वेळी ठरलेल्या अटींनुसार, कर्जरोखेच्या वितरणाच्या तारखेपासून ३ वर्षांच्या कालावधीनंतर, हे कर्जरोखे समहक्क भागा मध्ये पूर्णपणे रूपांतरित होण्यास पात्र असतील.

दिनांक २० एप्रिल २०१२ रोजी झालेल्या भाग धारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विशेष ठरावाद्वारे कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यास मान्यता देण्यात आली. 

आपण सादर केलेल्या विकल्प पत्रा नुसार आपण धारण केलेल्या ५० कर्जरोख्यांसाठी आपणास १० समहक्क भाग देण्यात आले आहेत. 

आपण धारण केलेल्या समहक्क भागाचा तपशील खालीलप्रमाणे :

रजिस्टर पृष्ठ क्रमांक कर्जराेख्याची संख्या समहक्क भाग वाटपांची संख्या

भाग दाखला क्रमांक

अनुक्रमांक नंबर
पासून पर्यंत
२२७ ५० १० २४५

६१

७०

कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिला जाणारा भाग दाखला सोबत जोडला आहे.

दि. ३० एप्रिल २०१२ पासून कर्जरोखे दाखला अविधीग्राह्य असेल.

कळावे.                                                         

आपला विश्वासू,
रेनबो इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

सही
श्री. संजय पी. पाटील
कंपनी चिटणीस

सोबत: भाग दाखला 

 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×