Advertisements
Advertisements
Question
कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा.
Advertisements
Solution
|
रेनबो इंडस्ट्रीज लिमिटेड 50/A, स्वामी नारायण रोड, तुंगा गाव, मुंबई - ७२, फोन: ०२२-२३६२६५३५ http//:www.rainbowindustries.co.in श्री. संजय पी. पाटील विषय: कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन महोदय, आपणास कळविण्यात येत आहे की, १२.५% दराचे १,००,००० परिवर्तनीय कर्जरोखेच्या वितरणाच्या वेळी ठरलेल्या अटींनुसार, कर्जरोखेच्या वितरणाच्या तारखेपासून ३ वर्षांच्या कालावधीनंतर, हे कर्जरोखे समहक्क भागा मध्ये पूर्णपणे रूपांतरित होण्यास पात्र असतील. दिनांक २० एप्रिल २०१२ रोजी झालेल्या भाग धारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विशेष ठरावाद्वारे कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यास मान्यता देण्यात आली. आपण सादर केलेल्या विकल्प पत्रा नुसार आपण धारण केलेल्या ५० कर्जरोख्यांसाठी आपणास १० समहक्क भाग देण्यात आले आहेत. आपण धारण केलेल्या समहक्क भागाचा तपशील खालीलप्रमाणे :
कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिला जाणारा भाग दाखला सोबत जोडला आहे. दि. ३० एप्रिल २०१२ पासून कर्जरोखे दाखला अविधीग्राह्य असेल. कळावे. आपला विश्वासू, सही सोबत: भाग दाखला |
||||||||||||||
