हिंदी

लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा.

भागधारकाच्या लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या पत्रास उत्तर लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

श्री सिमेंट इंडस्ट्रीस लिमिटेड.
नोंदणीकृत कार्यालय: ३१, तुळशी टॉवर, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५०
CIN: L50307 MH 2000 PLC160699

फोन: ०२२-२४२४५०२५
फॅक्स: ०२२-४५४५६०३५
संदर्भ क्र.: एस/एम.आर/डी/२५/१९-२०

संकेतस्थळ: www.shreecementindustriesltd.com
ई-मेल: [email protected]
दिनांक: २० एप्रिल, २०१९

कु. किशोर मालपानी
१५/२१, लोटस अपार्टमेंट,
बोरीवली (प.),
मुंबई – ४०० १०३.

विषय: लाभांशाचा दर कमी असल्याबाबतच्या तक्रारीबाबत.

आदरणीय महोदय,

आपले दिनांक १५ एप्रिल, २०१९ चे पत्र मिळाले. या पत्रात आपण लाभांशाचा दर कमी असल्याबाबतची तक्रार केल्याचे निदर्शनास आले. चालू वर्षी लाभांशाचा दर कमी असल्याची कारणे खालील प्रमाणे - 

  1. मागील वर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कंपनीची माहिम येथील शाखा पूर्णं कार्यक्षमतेने चालवता आली नाही.
  2. टाळता न येणार्या या नैसर्गिक आपत्तीमुके कंपनीस आर्थिक संकटास सामोरे जावे लागले. त्यामुके कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले.
  3. वरील परिस्थितीमुके संचालक मंडळाच्या  बैठकीत रु. बारा कोटी पन्नास लाख एवढी रक्कम राखीव निधी मध्ये वर्ग करण्यात आली. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत पन्नास टक्के (५०%) पेक्षा जास्त आहे. 

वरील खुलाश्यावरून आपले समाधान होईल असे वाटते. लवकरच कंपनी या आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि अल्पावधीत कंपनी जास्तीतजास्त लाभांश दर जाहीर करेल.

कळावे,

आपला विश्वासू,
श्री सिमेंट इंडस्ट्रीज करिता

सही
(श्री. सुहास बजाज)
कंपनी चिटणीस

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×