English

कर्जरोखेधारकास कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

कर्जरोखेधारकास कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

हल्क मोटर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: भूखंड क्र. ०५, कमर्शियल टॉवर्स,
पी.के. रोड, मुंबई - ४०००६७
CIN: R20020 MH 1000 PLC123456

दूरध्वनी: 022 12345678
फॅक्स: 022 - 11112222
संदर्भ क्र.: C/2060/20-18

वेबसाईट: www.hulkmotors.in
ई-मेल: [email protected]
दिनांक: 17 ऑक्टोबर, 2020

श्री. जॉन मेथीव
५०८, लोकेश अपार्टमेंट्स,
ए.के.डी. रोड,
मुंबई – ४०००८९

विषय: कर्जरोख्याचे वाटपाबाबत

महोदय,

आपल्या दिनांक २७ सप्टेंबर २०२० चा अर्ज क्र. V65432 ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळविण्यास सांगितले आहे की, आपणास प्रत्येकी १०० रुपयाचे १०% व्याज दराने १०० सुरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत. सदर कर्जरोख्याचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

सदर कर्जरोखे आपणास संचालक मंडळाच्या दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदींनुसार देण्यात आले आहेत.

कर्जरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे

1 2 3 4 5
पृष्ठ क्रमांक मागणी केलेले कर्जरोखे वाटप केलेले कर्जरोखे अनुक्रमांक मिळालेली रक्कम
      पासून पर्यंत  
डी-123 100 100 901 1000 ₹ 10,000

कर्जरोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे.
कळावे.

आपला विश्वासू,
हल्क मोटर्स लिमिटेड

सही            
श्री कमलेश गायकवाड
कंपनी चिटणीस

सोबत: कर्जरोखे प्रमाणपत्र

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×