English

खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्‍या अपवर्तनावरून कसे स्‍पष्‍ट कराल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्‍या अपवर्तनावरून कसे स्‍पष्‍ट कराल?

Answer in Brief
Advertisements

Solution

अपवर्तनी दूरदर्शक

F: पदार्थ भिंगाची मुख्य नाभी,

Fe : नेत्रिकेची मुख्य नाभी,

f: पदार्थ भिंगाचे नाभीय अंतर,

f: नेत्रिकेचे नाभीय अंतर. 

अपवर्तनी दूरदर्शी रचना :

(१) अपवर्तनी दूरदर्शी मध्ये दोन बहिर्वक्र भिंगे असतात. त्यांपैकी अधिक नाभीय अंतर व अधिक व्यास असलेले भिंग पदार्थ भिंग म्हणून काम करते, तर कमी नाभीय अंतर व कमी व्यास असलेले भिंग नेत्रिका म्हणून काम करते.

(२) पदार्थ भिंग हे धातूच्या लांब नळीच्या तोंडावर बसवलेले असून, या नळीमध्ये पुढे-मागे सरकवता येईल अशा बेताने एक कमी व्यासाची नळी बसवलेली असते. या नळीच्या बाहेरील तोंडावर नेत्रिका बसवलेली असते. पदार्थ भिंग व नेत्रिका यांचे मुख्य अक्ष एका सरळ रेषेत असतात. हे उपकरण बहुधा एखाद्या स्टँडवर उभारलेले असते.

कार्य : 

(१) पदार्थ भिंग दूरच्या वस्तूकडे रोखले असता, दूरच्या वस्तूकडून येणारे बव्हंशी समांतर प्रकाशकिरण पदार्थ भिंगातून जाऊन दूरच्या वस्तूची वास्तव, उलट व लहान प्रतिमा पदार्थ भिंगाच्या नाभीय प्रतलामध्ये तयार होते.

(२) त्यानंतर, नेत्रिकेपाशी डोळा ठेवून नेत्रिका असलेली नळी स्क्रूच्या साहाय्याने पुढे-मागे अशी सरकवतात की, पदार्थ भिंगाद्वारे तयार झालेली वास्तव प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय अंतराच्या आत पडते. मूळ वस्तूपेक्षा या वास्तव प्रतिमेने डोळ्याशी केलेला कोन मोठा असतो व ती नेत्रिकेसाठी वस्तू म्हणून काम करते. त्यामुळे नेत्रिकेपाशी डोळा धरून पाहिले असता, या प्रतिमेपासून आभासी व विशालित अशी प्रतिमा दिसते. परिणामतः दूरच्या वस्तूच्या अंगोपांगांचे निरीक्षण करणे शक्य होते. पदार्थ भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय प्रतलात असल्यास अंतिम प्रतिमा अनंत अंतरावर तयार होते.

shaalaa.com
बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [Page 92]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ५. | Page 92

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.


साध्या सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने _____ पट मोठी प्रतिमा मिळवता येते.


_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.


बहिर्गोल भिंग : अभिसारी भिंग : : अंतर्गोल भिंग : ______


साधा सूक्ष्मदर्शक : एक बहिर्गोल भिंग : : संयुक्त सूक्ष्मदर्शक : _____


: वस्तू भिंगाजवळ असताना : : : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.


बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.


निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×